Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Ferry Boat : मुंबई ते अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पावसाळ्यामुळे बंद असलेली मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 31, 2026 | 04:40 PM
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Follow Us
Follow Us:
  • पावसाळी विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग सागरी प्रवास पुन्हा सुरू
  • मेरीटाईम बोर्डाचा निर्णय
  • सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
भारत रांजणकर, अलिबाग : मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा (Ferry Boat ) कधी सुरु होणार याकडे येथील प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष असते.

फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा

हा मार्ग खुला होत असल्याने मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे. नऊ महिने अलिबाग मांडवा ते गेट वे ऑफ इंडीया, गेट वे ऑफ इंडीया ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या पंधरा लाखाच्या आसपास आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. दर अर्ध्यातासाने एक फेरीबोट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते. स्पीडबोट, रो-रो पेक्षा फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण, वाहतुक कोंडी यापासून सुटकाराम्हणून विशेषतः अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रवासी मुंबई-गोवा महामार्गावरुन किंवा इतरमार्गाने मुंबईला जाण्यापेक्षा अलिबाग,मुरुड मधील प्रवासी फेरीबोटीचा वापर जास्तीत जास्त करतात.

Satar News: गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हाती! साताऱ्यात पोलिसांचा ‘ग्राम सुरक्षा दल’ उपक्रम

पर्यटकांचा सर्वांत आवडता मार्ग

मुंबईतील पर्यटकांचा हा सर्वात आवडता मार्ग आहे. ऐतिहासिक गेटवे परिसराचा झगमगाट, प्रदुषण विरहीत जलप्रवास, प्रवासा दरम्यान सीगल पक्षांची संगत आणि जलवाहतुकीचा अनुभव लुटण्यासाठी मुंबईतील बहुतांशः पर्यटक स्वस्तात मस्त असलेल्या या मार्गाची निवड करतात. त्यामुळे या मार्गाने पुन्हापुनः यावेसे वाटते. १ सप्टेंबर पासून हा मार्ग खुला होत असल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला भरारी येईल, अशी आशा येथील पर्यटक व्यावसायिकांना आहे.

1 सप्टेंबरपासून मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला होणार आहे. खराब हवामानाचा जोपर्यंत अडथळा निर्माण होत नाही तोपर्यंत या मार्गावर दिवसा जलवाहतुक सुरु राहिल. फेरीबोट सुरु करण्यापुर्वी त्यांची डागडुजी, सुरक्षा साधनांची तपासणी करुन घेण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Web Title: Mumbai alibaug ferry boat service to resume from september 1 maritime board decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Alibaug
  • Mumbai
  • tourism

संबंधित बातम्या

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा
1

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी
2

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम
3

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार
4

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.