Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: “दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा,” प्रताप सरनाईक यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

दहिसर टोल नाक्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा होत असते. यामुळे प्रवासाचा वेळ वाढून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे. याचपार्श्वभूमीवर दहिसर टोल नाकासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2025 | 03:55 PM
"दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा," प्रताप सरनाईक यांची उपमुख्यमंत्र्‍यांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

"दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा," प्रताप सरनाईक यांची उपमुख्यमंत्र्‍यांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

 “महिला शाखाप्रमुख मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे नोंदवा”, शीतल म्हात्रे यांचं निवेदन

मंत्री सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास, स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

प्रवाशांचे म्हणणे काय?

गर्दीच्या वेळी दहिसरहून अंधेरीला पोहोचण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. दहिसर पथकर नाका बंद झाल्यास प्रवास करण्यास सोयीस्कर होईल.

विद्यार्थी, पालकांना दिलासा

शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने, अनेक पालक विद्यार्थ्यांसाठी अनाधिकृत वाहनांचा पर्याय निवडत आहेत. परंतु, आता परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय व्हॅनच्या परवान्यांचे वाटप खुले केले आहे. याबाबतची अधिसूचना जारी होणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. तर, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत शालेय व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

Onion farmers Politics: कांद्यावरून महाराष्ट्र-गुजरातमध्ये दुजाभाव; कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खासदारांची संसदेत घोषणाबाजी

Web Title: Minister pratap sarnaik demands relocation of dahisar toll plaza opposite western hotel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.