Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander News: बिबट्याच्या थरारक घटनेनंतर अग्निशमन व वन विभागाच्या धाडसाला सलाम; महापौरांकडून सन्मान

Mira-Bhayandar मधील भाईंदर परिसरात घडलेल्या बिबट्या शिरकावाच्या घटनेनंतर बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते अग्निशमन दल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 01:11 PM
Mira Bhayander

Mira Bhayander

Follow Us
Follow Us:
  • भाईंदरमध्ये बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
  • अग्निशमन दलाने जीवाची पर्वा न करता कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले.
  • वन विभागाने संयुक्त मोहिम राबवत बिबट्याला यशस्वीपणे पकडले.
Mira Bhayander: मिरा-भाईंदर शहरातील भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड परिसरात डिसेंबर महिन्यात घडलेल्या बिबट्या शिरकावाच्या थरारक घटनेची आठवण आजही नागरिकांच्या मनात ताजी आहे. या भीषण प्रसंगात जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या मिरा-भाईंदर अग्निशमन दल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आज (दि. ६ मे) महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Raigad News: जमीन दिली पण पैसे नाहीत! मुरुड-जंजिरा पुलाचे काम ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने आंदोलन

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

डिसेंबर महिन्यात रात्रीच्या सुमारास तलाव रोड परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळविल्यानंतर अग्निशमन दल व वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बिबट्याने एका तरुणीवर अचानक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने अतिशय धाडसाने आणि शिताफीने बचावकार्य हाती घेतले. एका घरामध्ये अडकलेल्या कुटुंबाला बिबट्याच्या धोक्यातून बाहेर काढणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. या कारवाईदरम्यान प्रत्येक क्षण अत्यंत तणावपूर्ण होता, तरीही अधिकाऱ्यांनी धैर्य आणि समन्वय दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते धाडसी जवानांचा सत्कार

यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवण्यात आली. विशेष जाळे आणि यंत्रणांचा वापर करून अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. आज झालेल्या महासभेत या सर्व धाडसी अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महापौर डिंपल मेहता यांनी त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्यांचा गौरव केला. यावेळी त्यांनी सांगितले की, “अशा कठीण आणि जीवघेण्या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने काम करणारे अग्निशमन दल आणि वन विभागाचे अधिकारी हे खऱ्या अर्थाने शहराचे हिरो आहेत. त्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.”

पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

महासभेत उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनीही या कार्याचे कौतुक करत अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या घटनेने आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमधील समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या संपूर्ण घटनेमुळे मिरा-भाईंदर शहरातील आपत्कालीन यंत्रणांची तत्परता आणि कार्यक्षमता समोर आली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Web Title: Mira bhayandar leopard incident brave officials honored for rescue operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Bhayander
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
1

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%
2

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द
3

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
4

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.