भाईंदरला कुपोषणाचे ग्रहण : गाने विकसित होणाऱ्या शहरात भयावह स्थिती
मीरा-भाईंदरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात कुपोषणाची भयावह स्थिती समोर आली आहे. शहरात सध्या एकूण १३९. कुपोषित बालके, त्यापैकी ९ अतिकुपोषित बालके असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरु नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने उपचार व आहार नियंत्रणासाठी त्रिसदस्यीय पथकाची नियुक्ती केली आहे.
कुपोषित मुले घरातच, उपचार मिळत नाहीच!
नुकतीच महापालिकेत आयोजित बैठकीत विवेक पंडित यांनी या मुद्द्यावर सखोल चर्चा केली. या वेळी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुले घरातच आहेत व त्यांना पोषक आहार देखील पुरवला जात नाही. यावर संतप्त होत विवेक पंडित यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी स्वतंत्र कक्ष असतानाही ही मुले तिये दाखल करण्यात आलेली नाहीत, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
पालिका बैठकीला अनेकांची उपस्थिती
या बैठकीस पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल, विविध शासकीय प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुपोषणासारख्या गहन समस्येकडे केवळ आकडेवारीत न राहता कृतीशील दृष्टीने पाहून, वैद्यकीय उपचार, पोषण आहार व शैक्षणिक सुविधा एकत्रितपणे दिल्यासच या समस्येवर उपाय सापडेल, अशी अपेक्षा आता नागरिकांना आहे.
त्रिसदस्यीय पथकाची केली नियुक्ती
कुपोषण नियंत्रणासाठी महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व पालिका अधिकारी यांचा समावेश असलेले
शासकीय यंत्रणांची दिसतेय उदासीनता
विवेक पंडित यांनी शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की, “कुपोषणामुळे एकही बालक दगावल्यास ती पालिकेची अपयशाची आणि शरमेची बाब ठरेल.” यामुळे प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तात्काळ कृती आरंभ करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जातीचा दाखला शाळेतच मिळणार
या बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्यांबाबतही चर्चा झाली. २४ अर्जदारांना दाखले देण्यात आले असून, उर्वरित ५ प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात जावे लागू नये. म्हणून, शाळेतच जातीचे दाखले देण्याचे निर्देश देखील विवेक पंडित यांनी दिले.त्रिसदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तातडीने कुपोषित बालकांवरील उपचारांचा आढावा घेऊन अहवाल सादर करणार आहे