ठाण्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने “निवडणूक पूर्व तयारी – अभ्यास वर्ग” आयोजित केला. वर्तक नगरमधील भाजप ठाणे मंडळ कार्यालयात झालेल्या या बैठकीत सुमारे ५०० कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या १३१ जागांसाठी पक्षाने सखोल तयारी सुरू केली असून, नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांचे ओळखपत्रही भरले जात आहेत. आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना संजय केळकर म्हणाले की, “निवडणुका जाहीर झाल्यावर तयारी ही आवश्यक असते. आमच्याकडे नवीन चेहरे आणि अनुभवी नेते दोघेही आहेत.” या बैठकीनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण अधिक रंगू लागले आहे.