मुंबई : मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) हे NCB केसचा पुन्हा एकदा तपास करत आहेत. या निर्णयाचं स्वागत आहे, असं भाजप नेते मोहित कंबोज भारतीय म्हणाले आहेत. मात्र यासोबतच त्यांनी या प्रकरणात मला चौकशीसाठी बोलवा माझ्याकडे याचे सर्व पुरावे
असल्याचा खळबळजनक दावा मोहित कंबोज भारतीय यांनी केला आहे.
एनसीबीचे अधिकारी ज्यांचा क्रूझ केसशी संबंध होता आणि त्यात काय भ्रष्टाचार झाला. त्यावर जी एसइटी बनली होती, त्याचा पुन्हा एकदा तपास करणार असल्याची माहिती आहे. त्याचं मी स्वागत करतो. या केसमध्ये सुनील पाटील, प्रभाकर साईल, किरण गोसावी, नवाब मलिक ते शिवसेनेचा एक मंत्री, याच बरोबर काँग्रेसचे असे कोणते आमदार यात होते, याचा तपास करावा. परेलमध्ये झालेला व्यवहार हा कोणी कोणासाठी केला याचाही तपास व्हावा. या प्रकरणात तपास करु गुन्हा दाखल करा, अशीही मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.
मी सर्व पुरावे द्यायला तयार – कंबोज
‘दुध का दुध और पानी का पानी’ झालं पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणात मला चौकशीसाठी बोलवा माझ्याकडे याचे सर्व पुरावे आहेत. यात सहभाग असलेली लोकं अजूनही अधिवेशनात बसली आहेत. त्यांचा यात काय रोल आहे, हे संपूर्ण जगापुढे यायला हवं. मी सर्व पुरावे द्यायला तयार आहे, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.