Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Dina Patil: “ड्रग्स माफियांच्या घरांवर बुलडोझर चालवा!”; खासदार संजय दिना पाटील यांचा सरकारवर घणाघाती हल्ला

खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईतील ड्रग्स माफियांच्या विरोधात बुलडोझर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई आणि बेस्ट अपघातांवरून सरकारवर टीका केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 29, 2026 | 08:43 PM
खासदार संजय दिना पाटील यांचा सरकारवर घणाघाती हल्ला

खासदार संजय दिना पाटील यांचा सरकारवर घणाघाती हल्ला

Follow Us
Follow Us:

 

  • “ड्रग्स माफियांच्या घरांवर बुलडोझर चालवा!
  • खासदार संजय दिना पाटील यांचा सरकारवर घणाघाती हल्ला
  • विकासकामे केवळ कागदावर नको प्रत्यक्षात दिसली पाहिजेत
नीता परब/ मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: शहरात वाढत चाललेल्या ड्रग्स माफियांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची घणाघाती टीका करत खासदार संजय दिना पाटील यांनी “ड्रग्स माफियांच्या घरांवर बुलडोझर चालवून कठोर कारवाई करा, अशी जोरदार मागणी केली आहे. वांद्रे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या विशेष बैठकीत त्यांनी सरकारच्या ढिसाळ कारभारावर हल्लाबोल केला.

शिवाजीनगर, गोवंडी परिसरात ड्रग्स माफियांचा वाढता प्रभाव चिंताजनक

शिवाजीनगर, गोवंडी परिसरात ड्रग्स माफियांचा वाढता प्रभाव अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद करत त्यांनी या गुन्हेगारीमुळे गंभीर घटना घडत असल्याकडे लक्ष वेधले. “माफियांकडे स्वतःचे सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आहेत, लहान मुलांना गुन्हेगारीत ओढले जात आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी एकत्रित आणि कठोर मोहीम राबवणे गरजेचे आहे, असे त्यांनी ठणकावले.

बेस्ट बसच्या अपघातांवर नियंत्रण असणे गरजेचे

बेस्ट बस अपघातांच्या वाढत्या घटनांवरही सरकारला जबाबदार धरले. चालकांना पुरेसे प्रशिक्षण, विश्रांती आणि सुविधा न दिल्यामुळे अपघात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मानसिक आणि शारीरिक तणावाखाली काम करणाऱ्या चालकांकडून सुरक्षित सेवा अपेक्षित ठेवणे ही प्रशासनाची मोठी चूक आहे, असा आरोप त्यांनी केला.पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भांडुप, मुलुंड आणि घाटकोपर भागातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या भागातच नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते, ही प्रशासनाची मोठी विडंबना आहे, अशी बोचरी टीका करत स्थानिक जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा

महिला उद्योग भवनासाठी मंजूर झालेला निधी दोनदा परत गेला

भांडुप येथे महिला उद्योग भवनासाठी मंजूर झालेला निधी दोनदा परत गेल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. यावेळी निधी परत जाऊ नये, अडचणी तातडीने दूर करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली. डम्पिंग ग्राऊंडच्या खोदकामातून बाहेर पडणारे केमिकल्स आणि गॅसमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले. लोकांच्या आरोग्याशी खेळ करून विकासाच्या नावाखाली कामे केली जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर प्रस्तावित गोल्फ कोर्सलाही त्यांनी तीव्र विरोध दर्शवत लोकांना गोल्फ नव्हे, तर रुग्णालये आणि शिक्षण सुविधा हव्यात, अशी भूमिका मांडली.

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी ईशान्य मुंबईतील डोंगराळ भागात तातडीने संरक्षण भिंती उभारण्याची मागणी केली. दरवर्षी जीवितहानी होत असूनही प्रशासन झोपलेले आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच भांडुप पश्चिममधील अरुंद रस्ते, रेल्वे परिसरातील अनधिकृत स्टॉल, पीएपी घरांमधील स्थानिकांवरील अन्याय आणि गोवंडीतील शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. कामचुकार अधिकारी आणि निष्क्रिय सरकारमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, असे ते म्हणाले.

विकासकामे केवळ कागदावर नको प्रत्यक्षात दिसली पाहिजेत

एकूणच, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबईतील नागरिकांचे विविध प्रश्न ठामपणे मांडत सरकारच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विकासकामे केवळ कागदावर नकोत, ती प्रत्यक्षात दिसली पाहिजेत, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका, अग्निशमन दल आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Mumbai: महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Web Title: Mp sanjay dina patil launches scathing attack on the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Maharashtra Goverment
  • Mumbai
  • Sanjay Dina Patil

संबंधित बातम्या

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल
1

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
2

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
3

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
4

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.