Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.ही समस्या केवळ पोलिसांच्या कारवाईने सुटणार नसून त्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 20, 2026 | 08:03 PM
“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
Follow Us
Follow Us:

मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन
गोरेगाव इथल्या ड्रग्स प्रकरणानंतर बोलावण्यात आलेली बैठक
आयोजक आणि काही अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक

मुंबई: मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्स) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने युवा पिढीला बसत असलेला अंमलीपदार्थांचा विळखा प्रकर्षाने जाणवला. या स्थितीत प्रतिबंधात्मक उपाय आणि युवा पिढीच्या जागरुकतेसाठी १ मे महाराष्ट्र दिनापासून नशामुक्त मुंबईसाठी ‘ मुंबई अगेन्स्ट ड्रग्स’ मोहीम राबवणार असल्याची माहिती उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. गोरेगाव इथल्या ड्रग्स प्रकरणानंतर मंत्री लोढा यांनी या कार्यालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम ही उपस्थित होते.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय बारकाईने गोरेगाव येथील प्रकरणात लक्ष घालत आहेत. मुंबई पोलिसांनीही आपली भूमिका चोख बजावत असून आयोजक आणि काही अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कडक शासन होईलच,पण या घटना परत परत घडू नयेत यासाठी जनजागृती महत्त्वाची आल्यानेच ही बैठक बोलवली असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. आदरणीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन १ मे २०२६ ते १ मे २०२७ या कालावधीत मुंबई अगेन्स्ट ड्रग्स’ ही मोहीम वर्षभर राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या प्राथमिक तत्वावर उपनगरात ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर या मोहिमेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. येत्या काही दिवसात वर्षभरातील कार्यक्रमांचा आराखडा निश्चित केला जाईल. तसेच यासंदर्भात एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कमिटीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात येतील. तसेच महापालिकेचे विद्यमान वॉर्ड अध्यक्ष या कमिटीचे उपाध्यक्ष असतील. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी , स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षण अधिकारी अशा १२ सदस्यांची कमिटी असेल. त्याचबरोबर स्थानिक संसद सदस्य, आमदार, नगरसेवक हे लोकप्रतिनिधी या कमिटीचे विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत, अशी माहितीही मंत्री लोढा यांनी दिली. सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, गैरसरकारी संस्था अर्थात एनजीओ च्या सहकार्याने ही कमिटी समाजात विविध उपक्रम राबवून तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून रोखण्याचे काम करणार आहे.

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा

मुंबई पोलिस गेल्या सोळा महिन्यांपासून ड्रग्स विरोधात कडक मोहीम राबवत आहेत.पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.ही समस्या केवळ पोलिसांच्या कारवाईने सुटणार नसून त्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. प्रशासनाने कितीही अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी काही समाजविघातक प्रवृत्ती समाजात असतात या प्रवृत्तींच्या विरोधात आता सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लढा उभारला जात आहे. असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

या बैठकी दरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम म्हणाले की, तरुण पिढीला सावरण्यासाठी त्यांच्याच सोशल मिडिया माध्यमाद्वारे जन जागृती झाली पाहिजे. प्रत्येक समिती कक्षेतील शाळा, कॉलेजेस, मोठ मोठे हॉटेल आणि मॉल या ठिकाणी जिथे तरुण असतील तिथे जागृती करणारे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. तरुण पिढीला मनोरंजनापासून रोखणे हा पर्याय नाही, तर विधायक आणि सुसंस्कृत पणे अमली पदार्थ विरहित त्यांना आनंद घेण्यासाठी समाजाने प्रवृत्त केले पाहिजे. तरुणांकडूनच जेव्हा अमलीपदार्थाला नकार देण्यात येईल, तेव्हा आपण ही लढाई जिंकलो असे म्हणता येईल, असे साटम यांनी सांगितले.

“महाराष्ट्रात युवक-युवतींसाठी…”; मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी दिली माहिती

या शिवाय उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, या गंभीर प्रश्नावर प्रशासन काटेकोरपणे काम करत आहे. बैठकीत करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून अधिक कार्यक्षम पद्धतीने हा विषय हाताळला जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
मंत्री लोढा यांनी बोलावलेल्या बैठकीत अमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, शिक्षण अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ही उपस्थित होते.

Web Title: Mumbai against drugs campaign for a drug free starting on maharashtra day said by mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Drugs Case
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल
1

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
3

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना
4

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.