Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धूर, धूळ आणि आरोग्याचा धोका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रदूषणामुळे वसई-विरारकर त्रस्त

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरवरील सुरू असलेल्या कामांमुळे वसई-विरार परिसरातील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 02:19 PM
धूर, धूळ आणि आरोग्याचा धोका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रदूषणामुळे वसई-विरारकर त्रस्त

धूर, धूळ आणि आरोग्याचा धोका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रदूषणामुळे वसई-विरारकर त्रस्त

Follow Us
Follow Us:
  • महामार्गालगत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे वसई-विरारमध्ये धूर आणि धुळीचे प्रमाण वाढले आहे.
  • रहिवाशांमध्ये श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि घसा दुखण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
  • प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, त्याचा परिणाम महामार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. विशेषतः वसई-विरार पट्टयातील नागरिकांना कामामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील मालजीपाडा आणि ससुनावघर परिसरात डांबर आणि सिमेंट काँक्रिट आरएमसी प्रकल्प सुरू आहेत. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी हे प्लांट प्रामुख्याने रात्रीचे सुरू केले जात असून, त्यामुळे निघणारे घातक धुलीकण परिसरात पसरत आहेत.

Purandar Airport News: पुरंदर विमानतळाचा ‘टेक-ऑफ’ सुसाट! ६३७ कोटींच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी

वसई-विरार शहर महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या संदर्भात शहरातील एक्यूआयवर चिंता व्यक्त केली होती. परंतु, तरीही परिस्थिती जैसे थे आहे. महामार्गालगत वसलेली आरएमसी संयंत्रे असोत, किंवा मग गोखिवरे डम्पिंग ग्राउंड-रात्र होताच, हे संपूर्ण परिसर पांढऱ्या धुराच्या दाट लोटांनी वेढले जातात. हा धूर केवळ दृश्यमानताच कमी करत नाही, तर वसई-विरारच्या रहिवाशांच्या फुफ्फुसांवर थेट हल्ललाही चढवत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

महामार्गालगत असलेल्या प्रकल्पांना प्रदूषण नियंत्रणासंदर्भात कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या प्रकल्पांमध्ये ‘स्क्रबर सिस्टीम’ (प्रदूषण निवारण यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आणि रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने प्रदूषण करताना आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- आनंद काटोळे, अधिकारी, ठाणे-पालघर प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हे प्रकल्प चालक निर्धास्तपणे आणि कोणाचीही भीती न बाळगता वागत आहेत. संबंधित विभागाने केवळ नोटिसा बजावण्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता, रात्रीच्या वेळी अचानक तपासण्या कराव्यात आणि प्रदूषण करणाऱ्या या प्रकल्यांचे काम त्वरित बंद पाडावे.- अनिल चौहान, स्थानिक रहिवासी

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन

रस्ते बांधकाम आणि विकास प्रकल्पांच्या नावाखाली, डांबराची मागणी प्रचंड वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत, अनेक प्रकल्प चालक कोणत्याही प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवल्याशिवायच आपले प्रकल्प चालवत आहेत. औद्योगिक प्रक्रियेदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या घातक वायूंचे नियंत्रण करण्यासाठी ‘स्क्रबर यंत्रणा’ बसवणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. असे असूनही, अनेक प्रकल्प चालक, खर्च वाचवण्याच्या उद्देशाने विषारी वायू थेट वातावरणात सोडत आहेत.

Mumbai News: औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात! ई-फार्मसीला विरोध, मेडिकल चालकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

वसईत सार्वजनिक आरोग्यापुढील संकट; आजारांचा धोका वाढते

  • रात्रभर उत्सर्जित होणाऱ्या उम्र धुरामुळे, रहिवाशांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ आणि घसा दुखणे अशा तक्रारी आता नित्याच्याच झाल्या आहेत.
  • वृद्ध आणि लहान मुलांसाठी, ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. महामार्गालगत असलेल्या शेतजमिनींवर सिमेंटच्या धुळीचा थर साचत आहे, ज्यामुळे सुपीक जमीन नापीक बनत चालली आहे.
  • एकेकाळी आपल्या हिरव्यागार निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश, आता धूळ आणि धुरामुळे आपली नैसर्गिक शोभा गमावून बसला आहे. झाडांवर साचलेल्या सिमेंटच्या धरामुळे त्यांची वाढ खुंटली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai ahmedabad highway work triggers pollution concerns in vasai virar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Mumbai News
  • NAVARASHTRA
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
2

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
3

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.