
फोटो सौजन्य- pinterest
अनेक अपघातांमध्ये ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघात ग्रस्तांना तात्काळ उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतील यासाठी अत्याधुनिक रुग्णालयाची गरज आहे.
या संपूर्ण पट्ट्यात महामार्ग पोलिस ठाणे व कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त नसल्याने रात्रीच्या वेळी लूटमार करणाऱ्या व टोळ्यांवर अंकुश राहिला नाही. वाहन पंचर करणे, दगड टाकून अडवणे आणि लूटमार करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. पोलीस गस्त नसल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. असे काही प्रकार झाल्यास कसारा, खर्डी, व शहापूर, वासिंद व पडघा पोलीस ठाण्यात मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडून यावे लागते त्यात ये-जा करण्यात पोलीस कर्मचारी फिर्यादी यांना अनेक हेलपाटे मारावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
समृद्धी महामार्गावर एक्सिट ही जवळपास नसल्याने चालक, प्रवाशी व पोलीस पथक हैराण होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या समृद्धी महामार्गावर आमने (भिवंडी) ते सिन्नर या १२० किलोमीटरच्या अंतरावर हॉटेल, पेट्रोल पंप, गॅरेज या सह क्रेन, रुग्णालय या गोष्टी उपलब्ध नसल्याने येथील प्रवास जिकरीचा होत असल्याचे मिलिंद देशमुख यांनी सांगितले.
अपघातग्रस्त व काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांनी संपर्क करण्यासाठी ११२ पोलीस मदत केंद्राची मदत घ्यावी लागते पण या स्थानिक पोलिसांना त्याठिकाणी पोहचण्यासाठी शहापूर व इगतपुरी येथून प्रवेश करावा लागत असल्याने बराच वेळ निघून जातो त्या दरम्यान एखादा अनुचित प्रकार घडून संशयित निघून जातात.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)