Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; दोन्ही दिशेची वाहतूक तातडीने बंद

मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि संपूर्ण बोगद्यात दाट धुराचे साम्राज्य पसरले. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही दिशेची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 15, 2026 | 03:24 PM
मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; दोन्ही दिशेची वाहतूक तातडीने बंद

मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; दोन्ही दिशेची वाहतूक तातडीने बंद

Follow Us
Follow Us:

Mumbai Coastal Road Tunnel News Marathi : मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागल्याने बुधवारी मोठी दुर्घटना टळली. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेनंतर बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली.

हा बोगदा कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हाजी अली आणि वरळी दरम्यान आहे. या घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल (एमएफबी), पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका सेवेचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाची वाहने तात्काळ बोगद्यात पोहोचली आणि आग विझवण्यास सुरुवात केली. बोगद्यातील आगीच्या ज्वाला पाहून ये-जा करणारे लोक घाबरले. अडकणे टाळण्यासाठी अनेक वाहनांनी अचानक यू-टर्न घेतल्याने काही काळ घबराट पसरली. घटनास्थळी असलेल्या पथकांनी बचावकार्य करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Mumbai News: परवानगीपूर्वीच केली मूर्तिकामाला सुरुवात! परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रेल्वे प्रशासनाची तंबी

सुरक्षेच्या दृष्टीने बोगद्यातील दोन्ही दिशेची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. धूर बाहेर काढण्यासाठी बोगद्यातील व्हेंटिलेशन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या घटनेमुळे कोस्टल रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र कार पूर्णपणे जळून नष्ट झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून बोगद्यातील सुरक्षितता व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे.

बोगद्यात गाडीला जेव्हा आग लागली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशाने सांगितले की, शौनक मोदी नामक एक्स युजरने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “मी याआधी अशा घटनेचा कधीही अनुभव घेतला नव्हता. आम्ही वरळीमधून कोस्टल रोडवर प्रवेश केला. पुढच्या काही मिनिटांत आमच्या पुढून लोक धावत येताना दिसले. आम्ही एका धावत येणाऱ्या व्यक्तीला विचारले की, पुढे काय झाले आहे. तो म्हणाला की, तिथे आग लागली आहे. अनेक लोक आपली गाडी तिथेच सोडून बाहेर पळण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. लोकांनी गाड्या तिथेच सोडल्यामुळे बोगद्यात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.”

Mumbai Metro 5: ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गिकेला मिळणार चालना! मेट्रो मार्ग 5 ला वेग, 27 हेक्टरमध्ये उभा राहतोय अत्याधुनिक कशेळी डेपो

Web Title: Mumbai coastal road tunnel car fire traffic halted smoke panic news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Car Fire
  • coastal road
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
1

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

Mumbai Hindi Rajbhasha Sammelan: नवी मुंबईत 14 सप्टेंबरला हिंदी राजभाषा संम्मेलन; मराठी सक्तीच्या वादात नव्या वादाची ठिणगी
2

Mumbai Hindi Rajbhasha Sammelan: नवी मुंबईत 14 सप्टेंबरला हिंदी राजभाषा संम्मेलन; मराठी सक्तीच्या वादात नव्या वादाची ठिणगी

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन
3

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण
4

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.