Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Heritage Conservation : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी! शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे, वरळी किल्ल्याचेही संवर्धन

Mumbai Heritage Conservation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मुंबईच्या वारसा संवर्धनाला चालना मिळणार आहे. वैभव संगोपन योजनेंतर्गत शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे संगोपनासाठी देण्यात आला असून, वरळी किल्ला, बाणगंगा आणि वरळी कोळीवाड्याच्या वारसा जतनावरही भर दिला जात आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 29, 2026 | 05:46 PM
Mumbai Heritage Conservation : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी! शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे, वरळी किल्ल्याचेही संवर्धन

Mumbai Heritage Conservation : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी! शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे, वरळी किल्ल्याचेही संवर्धन

Follow Us
Follow Us:
  • द हेरिटेज प्रोजेक्टच्या माध्यमातून उपक्रम
  • वैभव संगोपन योजनेंतर्गत किल्ल्याचे संगोपन
  • कोळी महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन
 

मुंबईचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरांचा वारसा जतन (Mumbai Heritage Conservation) करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या विशेष सहकार्याने वारसा संवर्धनाच्या उपक्रमांना चालना मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार आरपीजी फाउंडेशनने शिवडी किल्ला संगोपनासाठी दत्तक घेतला आहे.
याच योजनेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याच्या संवर्धनालाही चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, स्थानिक संस्कृतीचे दस्तऐवजीकरण, नागरी सुविधांमध्ये सुधारणा आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगारनिर्मिती, अशा विविध अंगांनी मुंबईच्या वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

द हेरिटेज प्रोजेक्टच्या माध्यमातून उपक्रम

आरपीजी फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या ‘द हेरिटेज प्रोजेक्ट’च्या माध्यमातून बाणगंगा, वरळी कोळीवाडा आणि शिवडी किल्ला या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी संशोधन, जनसहभाग, सांस्कृतिक उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 50 हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले असून, 270 हून अधिक महिलांना उपजीविका आणि उद्योजकतेसाठी सहकार्य करण्यात आले आहे.

Tiger Shroff Firing Case Update: सुरक्षा रक्षकांशिवाय फुटबॉल खेळत होता टायगर! शूटर अगदी जवळ, तरीही का नाही झाला हल्ला?

वैभव संगोपन योजनेंतर्गत किल्ल्याचे संगोपन

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील ऐतिहासिक शिवडी किल्ला हा शहराच्या सागरी इतिहासाचा महत्वपूर्ण भाग आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप जतन करून त्याला नव्याने ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत आरपीजी फाउंडेशनने किल्ला संगोपनासाठी दत्तक घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या मान्यतेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

किल्ल्याचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि मुंबईच्या सागरी वारशाशी असलेले नाते नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संग्रहालय आणि माहिती केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून ऐतिहासिक स्थळाचे महत्व अधोरेखित होण्यासोबतच नागरिक आणि पर्यटकांना मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे.

गोवंडी- मानखुर्दकडे दुर्लक्ष… मुंबई फक्त श्रीमंतांसाठीच! राज्य सरकार आणि महापालिकेवर सापत्न भावाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप

वरळी किल्ल्याच्या संवर्धनालाही प्राधान्य

वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. वरळी कोळीवाड्यातील वारसा संवर्धनाच्या कामाचा किल्ल्यापर्यंत विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. कोळी समाजाचा इतिहास, परंपरा, जीवनशैली आणि सांस्कृतिक ओळख जतन करून हा वारसा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जात आहे.
वरळी कोळीवाड्यात 71 हून अधिक पथदिवे, 30 हून अधिक माहितीफलक आणि सातहून अधिक सार्वजनिक भित्तिचित्रे उभारण्यात आली आहेत. यामुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यासोबतच कोळी समाजाच्या सांस्कृतिक वारशाला सार्वजनिक व्यासपीठ मिळत आहे.

कोळी महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन

वरळी कोळीवाड्यातील 120 हून अधिक महिलांना कौशल्यविकास आणि उद्योजकतेसाठी सहकार्य करण्यात आले आहे. ‘शेफ्स ऑफ कोळीवाडा’ या उपक्रमातून महिलांनी पारंपरिक कोळी खाद्यसंस्कृतीला नवी ओळख मिळवून दिली आहे. विविध खाद्य महोत्सव आणि प्रदर्शनांमधील सहभागामुळे त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळत असून, स्थानिक परंपरांच्या जतनासोबत रोजगारनिर्मितीलाही हातभार लागत आहे.

बाणगंगा परिसराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात वारसा संवर्धनासोबतच या स्थळाचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत 150 हून अधिक महिलांना उद्योजकता, शिवणकाम आणि आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध कार्यक्रम आणि अनुभवात्मक उपक्रमांच्या माध्यमातून 500 हून अधिक पर्यटकांनाही या वारसास्थळाशी जोडण्यात आले आहे.

मुंबईचा वारसा हा केवळ ऐतिहासिक वास्तूंपुरता मर्यादित नसून, स्थानिक समुदायांच्या परंपरा, कला, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीतही तो जिवंत आहे. त्यामुळे वारसा संवर्धनासोबतच परिसरातील नागरी सुविधा सुधारणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि पर्यटनाला चालना देणे यांना महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून शिवडी आणि वरळी किल्ल्यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे संगोपन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे सफल होताना दिसत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवडी किल्ल्याच्या संगोपनाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे?

    Ans: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत आरपीजी फाउंडेशनने शिवडी किल्ला संगोपनासाठी दत्तक घेतला आहे.

  • Que: वरळी किल्ल्याच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?

    Ans: वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याच्या संवर्धनाला चालना देण्याचे आणि वरळी कोळीवाड्यातील वारसा जतनाचे काम किल्ल्यापर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • Que: शिवडी किल्ल्यावर कोणत्या सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे?

    Ans: किल्ल्याचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि मुंबईच्या सागरी वारशाची माहिती देण्यासाठी संग्रहालय आणि माहिती केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Mumbai heritage conservation shivdi fort rpg foundation worli fort rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • fort

संबंधित बातम्या

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
1

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

Devendra Fadnavis : व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाला गती द्या; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाला गती द्या; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
3

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

Nagpur News : प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपणे काळाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
4

Nagpur News : प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपणे काळाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.