Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांना दिलासा! पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टळणार, सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्सवर बसणार लोखंडी कवच

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होत असते. यावर उपाय म्हणून पालिकेने सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्स आणि आउटफॉल्सवर विशेष लोखंडी जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 10:52 AM
मुंबईकरांना दिलासा! पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टळणार, सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्सवर बसणार लोखंडी कवच

मुंबईकरांना दिलासा! पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टळणार, सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्सवर बसणार लोखंडी कवच

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात रुळांवर पाणी साचू नये म्हणून कल्व्हर्ट्सवर लोखंडी जाळ्या बसवण्यात येणार.
  • कचरा व प्लास्टिक अडवल्याने पाण्याचा निचरा सुरळीत राहणार, लोकल सेवेला फायदा होणार.
  • सायन, माटुंगा, परळ आणि शिवडी परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या कमी होण्याची शक्यता.
दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या समस्येवर पालिकेने योजना आखली आहे. यानुसार मध्य आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्स आणि पाणी उपसा करणाऱ्या आउटफॉल्सच्या ठिकाणी कचरा अडकणे टाळण्यासाठी पालिकेने गॅल्व्हनाइज्ड एम.एस. स्क्रीन बसवण्याचे काम प्रत्यक्ष मैदानात युद्धपातळीवर सुरू केले आहे. तर पावसाळा तोंडावर असल्याने पर्जन्यजल वाहिन्या विभागाकडून दिवस-रात्र हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सिडकोमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! विजय सिंघल यांची बदली; अश्विन मुद्गल नवे व्यवस्थापकीय संचालक

मुंबईतील एफ-दक्षिण (परळ-शिवडी) आणि एफ-उत्तर (माटुंगा-सायन) हे विभाग भौगोलिकदृष्ट्या सखल भागात येत असल्याने मुसळधार पावसात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. शहरातील कचरा आणि प्लास्टिक पाण्याच्या प्रवाहासोबत – वाहून आल्यामुळे रेल्वे रुळांखालील कल्व्हर्ट्स आणि पाण्याचा निचरा करणारी मुख्य आउटफॉल्सची तोंडे पूर्णपणे बंद – (ब्लॉक) होतात. परिणामी, पाण्याचा निचरा थांबून साचलेले पाणी थेट रेल्वे रुळांवर येते आणि मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प होते. हीच समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी पालिकेने आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

रुळांवर पाणी साचण्याचा अडसर दूर

रेल्वे कल्व्हर्ट्सवर या मजबूत लोखंडी जाळ्या बसवल्यामुळे कचरा आणि प्लास्टिक पाण्याचा प्रवाहासोबत पुढे वाहून जाणार नाही, तो जाळीपाशीच अडवला जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अखंड सुरू राहणार असून रेल्वे रुळावर पाणी साचण्याचा धोका टळणार आहे. परिणामी याचा थेट फायदा मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार असून, यंदा लोकल खोळवण्याची भीती कमी होणार आहे.

अधिकारी ठेवणार थेट देखरेख

पावसाळा अगदी तोंडावर असल्याने पालिकेने कंत्राटदाराला हे काम अत्यंत कमी कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. सध्या नियोजित स्थळावर काम वेगाने सुरू असून, पर्जन्यजल वाहिन्या कार्यशाळा विभागाचे अधिकारी यावर थेट देखरेख ठेवून आहेत. पालिकेच्या या तत्परतेमुळे यंदाच्या पावसाळ्यात मध्य आणि हार्बर रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल, अशी आशा मुंबईकरांना आहे.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

स्थानिक रहिवाशांना मिळणार मोठा दिलासा

  • हे काम वेगाने सुरू असल्यामुळे सायन, माटुंगा, परळ आणि शिवडी या सखल परिसरातील रस्त्यांवर आणि
  • गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी साचण्याच्या समस्येपासून स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून
  • यंदा नागरिकांच्या घरात किवा आवारात पाणी शिरण्याची शक्यता कमालीची कमी होईल, असा दावा पालिकेने केला आहे.
  • याशिवाय, आउटफॉल्स आणि कल्व्हर्ट्सच्या तोंडाशी जाळ्या बसवल्यामुळे जमा झालेला कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणाहून सहज आणि तातडीने उपसता येईल. यामुळे पावसाळ्यात ऐनवेळी कचरा साफ करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. व पाण्याचा वेगाने निचरा करणे शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Mumbai local train rainy season bmc iron grills on railway culverts to prevent waterlogging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • BMC
  • central railway
  • Local in Mumbai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.