फोटो सौजन्य सोशल मिडिया
मुंबईसारख्या शहरात मलेरियामुळे 02 जणांचा मृत्यू झाला असून मलेरिया या आजारामुळे मृत्यू न होण्याचा गेल्या तीन वर्षांचा कालावधी खंडित झाला आहे. मुंबईसारख्या शहराच्या दृष्टीने आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही एक चिंताजनक बाब आहे.
‘नॅशनल सेंटर फॉर वेक्टर-बॉर्न डिसीज कंट्रोल’च्या आकडेवारीनुसार मुंबईत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत 2022 पासून (जेव्हा शहरात 3, 985३ इतक्या रुग्णांची नोंद झाली होती ) आता ही नोंदणी मध्ये दुप्पटींने वाढ होऊन 2025 मध्ये ती 10, 163 वर पोहोचली, ही वाढ 155 टक्के दर्शवते तथापि, ही रुग्णसंख्या 2004 मध्ये नोंदवलेल्या उच्चांकापेक्षा ( 14,756) रुग्ण आणि (23 मृत्यू ) अजूनही कमी आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, 2026 मधील रुग्णसंख्या ही संपूर्ण 2025 वर्षात नोंदवलेल्या 10, 163 रुग्णांच्या संख्येच्या 91.05 टक्क्यांवर गेली आहे.
डॉ. महेंद्र जगताप यांनी फॅल्सिपॅरम मलेरिया बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॅा. महेंद्र जगताप म्हणाले फॅल्सिपॅरम मलेरिया हा मलेरियाचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. तो थेट मेंदूवर आणि शरीराच्या मुख्य अवयवांवर परिणाम करतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खालील दिलेल्या 03 गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे
फॅल्सिपॅरम मलेरिया मध्ये योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॅल्सिपॅरमसाठीचे विशेष डोस असतात. त्यात ACT किंवा इतर अँटी-मलेरिया औषधे ही औषधे वेळेत आणि पूर्ण घेणे गरजेचे आहे.
फॅल्सिपॅरम मलेरिया या आजारा मध्ये रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे, त्याच बरोबर योग्य आणि संतुलित आहेर घेणे महत्वाचे आहे. तसेच वेळेवर विश्रांती करणे गरजेचे आहे.मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीचे आजार असलेल्या रुग्णांना.गर्भवती महिला आणि लहान मुलांना ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. अशा लोकांना या आजाराच्या उपचारांबद्दल आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल अधिक माहिती द्या. आणि फॅल्सिपॅरम मलेरिया मात करा.






