Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Mumbai Metro: गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महा मुंबई मेट्रोच्या मार्गिका २अ, ७, ९ आणि २बवर सेवा रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नेहमी रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची मेट्रो या कालावधीत रात्री १२.३० वाजता सुटेल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2026 | 01:23 PM
गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Follow Us
Follow Us:
  • बाप्पाच्या दर्शनाला रात्री उशिरापर्यंत फिरा!
  • गणेशोत्सवात मेट्रोची वेळ वाढली
  • शेवटची फेरी १२.३० वाजता
Mumbai Metro : गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत विविध गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेणाऱ्या मुंबईकरांसाठी महा मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) विशेष सुविधा जाहीर केली आहे. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७, ९ आणि २बवर सेवा रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नियमित सेवांव्यतिरिक्त १० ते १५ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

शेवटची मेट्रो रात्री १२.३० वाजता

सध्या संबंधित स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता सुटते. मात्र गणेशोत्सवाच्या कालावधीत ही वेळ दीड तासाने वाढवण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम आणि दहिसर पूर्व येथून मार्गिका २अ, गुंदवली आणि काशीगाव येथून मार्गिका ७ व ९ तसेच महाराष्ट्र नगर-मंडाळे आणि चेंबूर येथून मार्गिका २बची शेवटची मेट्रो रात्री १२.३० वाजता सुटणार आहे.

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू

कोणत्या मार्गिकेवर किती अतिरिक्त फेऱ्या?

सोमवार ते शुक्रवार मार्गिका २अवर एकूण २९९ फेऱ्या चालवण्यात येतील. यामध्ये १० अतिरिक्त फेऱ्यांचा समावेश आहे. मार्गिका ७ आणि ९वर २९० फेऱ्या चालणार असून त्यापैकी १४ फेऱ्या अतिरिक्त असतील. मार्गिका २बवर १८० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून १५ अतिरिक्त फेऱ्या असतील.

शनिवारी मार्गिका २अवर १० अतिरिक्त फेऱ्यांसह २४१ फेऱ्या, मार्गिका ७ आणि ९वर १४ अतिरिक्त फेऱ्यांसह २३७ फेऱ्या, तर मार्गिका २बवर १५ अतिरिक्त फेऱ्यांसह १८० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

रविवारी मार्गिका २अवर २२३, मार्गिका ७ आणि ९वर २१९, तर मार्गिका २बवर १८० फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. यामध्ये अनुक्रमे १०, १४ आणि १५ अतिरिक्त फेऱ्यांचा समावेश असेल.

गणेशभक्तांना रात्रीच्या प्रवासात दिलासा

मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक बाहेर पडतात. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण येतो. वाढीव मेट्रो सेवेमुळे भाविकांना रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेऊन सार्वजनिक वाहतुकीने घरी परतणे अधिक सोयीचे होणार आहे.

महा मुंबई मेट्रोच्या या विशेष व्यवस्थेमुळे विविध गणेश मंडळे आणि उत्सवस्थळांपर्यंत सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून यंदाचा गणेशोत्सव वाहतूक कोंडीमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Web Title: Mumbai metro extended services till 12 30 am during ganeshotsav 2026 on lines 2a 7 9 2b

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Metro
  • Mumbai

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
1

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू
2

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
3

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात
4

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.