Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

MNS: कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनसे कार्यकर्त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणून प्राचार्यांना व तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. महाविद्यालयाच्या परिसरात आणि प्राचार्यांच्या केबिनमध्ये विनापरवानगी बेकायदेशीरपणे प्रवेश करून घोषणाबाजी अमित ठाकरेंसह दोन मनसे कार्यकर्त्यांवर आरोप असा आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 01, 2026 | 12:33 PM
Amit Thackeray, MNS Pune, PM Narendra Modi Photo Dispute,

Amit Thackeray, MNS Pune, PM Narendra Modi Photo Dispute,

Follow Us
Follow Us:
  • मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह २०-२५ कार्यकर्त्यांवर चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल.
  • प्राचार्यांच्या कक्षातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याचा ठपका.
  • मध्यरात्री मनसे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे यांना अटक.
Amit Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसैनिकांवर पुणे पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे. अमित ठाकरे यांच्यासह मनसैनिकांवर सोमवारी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन मनसैनिकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृह, कॅन्टीन आणि असुविधांच्या तक्रारींसंदर्भात प्राचार्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, प्राचार्यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते.

Major Rishabh Singh Sambyal Resignation: वर्दी उतरवण्याचा विचार केला नव्हता…; ‘नॅशनल क्रश’ मेजर ऋषभ संब्याल यांची भावूक पोस्ट

ते पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी लावण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर लगेच उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या ठिकाणाहून खाली उतरवले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेनंतर पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ मनसैनिकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यातील राजकारण तापले असतानाच, पोलिसांनी मध्यरात्री कनोजिया आणि भिलारे यांन अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचा सूर उमटत आहे. पुणे पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली

कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनसे कार्यकर्त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणून प्राचार्यांना व तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. महाविद्यालयाच्या परिसरात आणि प्राचार्यांच्या केबिनमध्ये विनापरवानगी बेकायदेशीरपणे प्रवेश करून घोषणाबाजी अमित ठाकरेंसह दोन मनसे कार्यकर्त्यांवर आरोप असा आहे. राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमित ठाकरेंच्या सह २० ते २५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

अमित ठाकरेंना अद्याप अटक झालेली नसली तरी, त्यांना त्यांना पोलीस चौकशीची नोटीस पाठवली जाऊ शकते. तर इतर दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि घोषणाबाजी करणे या कलमांतर्गत पोलिसांनी ही कारवाई केलीआहे.

 

Web Title: Pune newsfir against amit thackeray and mns workers in pune for removing pm modi photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Maharashtra Politics
  • MNS
  • PM Modi
  • Pune

संबंधित बातम्या

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल; ट्रेसपासिंग आणि धमकीचा आरोप
1

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल; ट्रेसपासिंग आणि धमकीचा आरोप

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित
2

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
3

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
4

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.