Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले

खड्ड्यांमुळे सतत होणारे अपघात आणि त्यासाठी जबाबदार अधिकारी टाळाटाळ पाहून न्यायालयाने हस्तक्षेप केला. प्रत्येक नगरपालिकेत विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश

  • By Dilip Bane
Updated On: Nov 25, 2025 | 02:10 PM
Mumbai Thane Corporations, Pothole-Related Deaths

Mumbai Thane Corporations, Pothole-Related Deaths

Follow Us
Close
Follow Us:
  • खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंवर उच्च न्यायालयाची कठोर भूमिका
  • महापालिका आणि एमएमआरडीएमधील ‘अखत्यारी’ वादावर न्यायालयाची चीड
  • समाधान न झाल्यास 50-50% भरपाईचे आदेश देण्याचा इशारा
  • प्रत्येक नगरपालिकेत विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश
मुंबई आणि ठाणे परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढणारे अपघात आणि मृत्यू हा चिंतेचा विषय बनला असताना, या प्रकरणी जबाबदारी झटकणाऱ्या महानगरपालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. रस्त्यांवरील खड्डे, त्यातून होणारे अपघात आणि पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी भरपाई यावर न्यायालयाने सोमवारी कठोर भूमिका घेतली.

Mumbai Metro 3 : मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

विक्रोळी परिसरात ऑगस्ट महिन्यात खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर भरपाईबाबत जबाबदारी कोणाची यावर एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेमध्ये वाद निर्माण झाला. महापालिकेने हा रस्ता एमएमआरडीएच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले, तर एमएमआरडीएने हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याचा दावा केला. दोन्ही यंत्रणा भरपाईपासून हात झटकताना दिसल्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

खंडपीठातील न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट इशारा दिला की, प्राधिकरणांनी हा वाद मैत्रीपूर्णरित्या सोडवावा; अन्यथा न्यायालय सर्वच जबाबदार यंत्रणांना 50-50 टक्के भरपाई देण्याचे आदेश देईल.

मुंबई लोकलचा होणार कायापालट! मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी १० ते १२ लोकल फेऱ्यांची वाढ, हार्बर मार्गावरही एसी लोकल धावणार

न्यायालयाने म्हटले, “रस्त्यांची दुरवस्था रोखण्याऐवजी अधिकारी एकमेकांवर दोषारोप करतात. परंतु वास्तविक जबाबदारी झटकून चालणार नाही. संबंधित कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे.”

यासोबतच, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेकडे विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही समिती खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांच्या तक्रारींची चौकशी करून भरपाईबाबत निर्णय घेणार आहे. तसेच, समिती स्थापन होण्यापूर्वी दाखल केलेल्या तक्रारींचीही दखल घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला का फटकारले?

    Ans: खड्ड्यांमुळे सतत होणारे अपघात आणि त्यासाठी जबाबदार अधिकारी टाळाटाळ पाहून न्यायालयाने हस्तक्षेप केला.

  • Que: खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास भरपाई कोण देणार?

    Ans: सर्व संबंधित अधिकारी समप्रमाणात (50-50) भरपाई देण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते.

  • Que: समितीचे काम काय असेल?

    Ans: खड्डे-संबंधित अपघातांची चौकशी करून योग्य भरपाई किती द्यायची याचा निर्णय घेणे.

Web Title: Mumbai thane corporations pulled up high court warns over pothole related deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • Thane Municipal Corporation

संबंधित बातम्या

Mumbai Crime: पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा सडलेला मृतदेह; अत्याचार करून हत्येचा संशय
1

Mumbai Crime: पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा सडलेला मृतदेह; अत्याचार करून हत्येचा संशय

Mumbai Metro 3 : मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल
2

Mumbai Metro 3 : मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा
3

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा

पहिलं मानधन फक्त 51 रुपये! बॉलीवूडचे He-Man यांनी शिक्षण कुठे घेतले? जाणून घ्या गावातील शाळेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
4

पहिलं मानधन फक्त 51 रुपये! बॉलीवूडचे He-Man यांनी शिक्षण कुठे घेतले? जाणून घ्या गावातील शाळेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.