महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली तरी अजूनही पाणीपुरवठ्याचं चिन्हं कुठे दिसून येत नाही. मुंबईकरांना अजून काही दिवस पाणी जपूण वापरावं लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही भागांचं 100 टक्के पाणी कपात करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. पावसाळा सुरु असताना पाणी टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे.
[read_also content=”डोंबिवलीतील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/a-severe-fire-broke-out-at-a-chemical-company-in-dombivli-nrka-546604.html”]
वाशीनाका येथे जलद्वार बसविण्यासाठी गुरुवारी (13 जून) सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत एम पूर्व व एम पश्चिम विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, H.P.C.L. रिफायनरी भागांत पाणीपुरवठयातील दाब सुधारण्याचे काम करण्यात येणार आहे. या अंतर्गत 750 मिमी व्यासाचे स्ल्यूस गेट बसविण्यात येणार आहे. परिणामी या कामासाठी मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम विभागांतील पाणीपुरवठा उद्या बंद करण्यात येणार आहे.
या परिसरातला पाणीपुरवठा बंद
‘एम-पूर्व’ विभाग: लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीरामनगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (B.P.C.L.) वसाहत, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, गव्हाणपाडा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणुप्रक्रिया केंद्र (B.A .R.C.), वरुण बेवरेजस आदी ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहिल.
‘एम-पश्चिम’: माहुलगाव, अंबापाडा, जिजामातानगर, वाशी नाका, म्हैसूर वसाहत, खडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (आर. सी.) मार्ग, शहाजीनगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोसनगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी या भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहिल. (फोटो सौजन्य-मीन्ट)






