Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

धारूर शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 04:37 PM
धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

Follow Us
Follow Us:
  • धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा
  • आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी
  • शेतकऱ्यांना विनाविलंब भरपाई मिळवून द्या
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी आज तालुक्यातील धारूर गावातील बाधित शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना विनाविलंब भरपाई मिळवून द्या, अशा कडक सूचना त्यांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या.

​प्रशासकीय फौजफाटा बांधावर

​नुकसानीची तीव्रता पाहता आमदार कैलास पाटील यांच्यासोबत तहसीलदार मृणाल जाधव, तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाणे आणि महसूल व कृषी विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी आमदारांकडे आपल्या व्यथा मांडल्या. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, अशी भावना यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

​तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

​पाहणी दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, नुकसानीचा कोणताही भाग सर्वेक्षणातून सुटता कामा नये. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करावेत आणि त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल.

​शेतकऱ्यांचा मोठा सहभाग ​या पाहणी दौऱ्यावेळी धारूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन थेट बांधावर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा पाहायला मिळाला.

धाराशिव तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत भयंकर वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा दिला. धारूर, केशेगाव, कोल्हेगाव आदी परिसरात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विठ्ठलवाडी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवंडले आणि काही क्षणातच जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर मुसळधार पावसासह मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाला. विशेषतः धारूर परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की, शेतजमिनींसह रस्तेही गारांच्या थराने पांढरेशुभ्र झाले. अनेक ठिकाणी गारांचा खच साचल्याने जणू बर्फवृष्टी झाल्याचा भास होत होता.

Devendra Fadnavis: “लज्जास्पद आणि अशोभनीय”, मल्लिकार्जुन यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

Web Title: Dharur unseasonal rain damage mla kailas patil inspection news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Kailas Patil
  • maharashtra
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.