Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update: नागरिकांनो सावधान! २२ ते २५ एप्रिल दरम्यान ‘या’ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासन सतर्क

२२ ते २५ एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून संभाव्य अवकाळी पाऊस व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 06:40 PM
नागरिकांनो सावधान! २२ ते २५ एप्रिल दरम्यान 'या' जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासन सतर्क

नागरिकांनो सावधान! २२ ते २५ एप्रिल दरम्यान 'या' जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासन सतर्क

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना २२ ते २५ एप्रिल दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः नदीकाठावरील व पूरप्रवण भागातील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे.

Dharashiv News : मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपाचा धाराशिवमध्ये परिणाम; शासकीय कामकाज ठप्प

तसेच, वीज कोसळण्याच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, झाडाखाली थांबणे टाळावे आणि अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या असून कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचारण कडवकर यांनी केले आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी तडाखा बसणार आहे. मुंबई आणि कोकण भागात तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, कोल्हापूर आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

तापमान ४३ अंशांवर पोहोचणार…

आयएमडीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. २३ ते २५ एप्रिल दरम्यान, कोकण आणि मराठवाड्याच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत विदर्भ प्रदेशातही तापमान वाढण्याची शक्यता असून, २४ एप्रिल रोजी अमरावती आणि अकोला येथे उष्णतेच्या पिवळ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai-Pune Expressway Megablock : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Web Title: Dharashiv yellow alert april 22 25 weather update news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Dharashiv
  • imd
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
4

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.