Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई विमानतळावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण; दि. बा. पाटील यांचेच नाव कायम राहणार; फडणवीसांची मोठी घोषणा

नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे ठरलेले आहे. केंद्र सरकारकडे त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच हे नामकरण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 06, 2026 | 12:40 PM
नवी मुंबई विमानतळावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण; दि. बा. पाटील यांचेच नाव कायम राहणार; फडणवीसांची मोठी घोषणा

नवी मुंबई विमानतळावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण; दि. बा. पाटील यांचेच नाव कायम राहणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई विमानतळावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
  • केवळ ८ महिन्यांत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची उभारणी
  • नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देणार
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत साकारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे विमानतळ परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळाली आहे. या अनावरण सोहळ्याला विविध मान्यवर, स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे महत्त्व अधोरेखित करत, विमानतळावर उभारलेला हा पुतळा राज्याच्या अभिमानाचे प्रतीक ठरेल, असे सांगितले. आधुनिक पायाभूत सुविधांसोबत इतिहासाची जोड देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Inflation Protest : महागाईविरोधातील आंदोलन आक्रमक; सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केली. विमानतळाला दिवंगत नेते D. B. Patil यांचेच नाव कायम ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाव बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे ठरलेले आहे. केंद्र सरकारकडे त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच हे नामकरण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि मुंबईवरील वाढता ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणामुळे या प्रकल्पाला सांस्कृतिक आणि भावनिक अधोरेखन मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षणांची आठवण करून देणारा असून ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. शतकानुशतके स्वराज्याच्या विचारांना प्रेरणा देणारा हा दिवस दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो.

डी. बी. पाटील कोण होते?

राजकीय कारकिर्दीत त्यांनी पाच वेळा आमदार, एकदा विधान परिषदेचे सदस्य आणि दोन वेळा खासदार म्हणून काम केले. त्यांनी एकदा कुलाबा स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आणि एकदा शहर अध्यक्ष म्हणूनही काम केले. ते पनवेलमधून पाच वेळा आमदार होते, तसेच कुलाबा येथून खासदार म्हणूनही निवडून आले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (NMIA) दिवंगत डी. बी. पाटील, उर्फ ​​दिंका बाळू पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळाला त्यांचे नाव देण्यासाठी पक्षांनी मोहीम चालवली होती, जी यशस्वी झाली. नवीन विमानतळाला शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचीही मागणी होती, परंतु अखेरीस डी. बी. पाटील यांचे नाव निवडण्यात आले.

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल! नव्या जबाबदाऱ्यांसह कामगिरीकडे लागल्या सर्वांच्या नजरा

Web Title: Navi mumbai airport shivaji maharaj statue unveiled devendra fadnavis dba patil name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  • devendra fadnavis
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
1

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव
2

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
3

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा
4

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.