Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळ नामांतरण प्रश्नावर भूमिपुत्र आक्रमक; पायी चालत करणार आंदोलन

नवी मुंबई विमानतळ नामांतरणाचा वाद काही मिटता मिटेना झाला आहे. हा वाद आता दिवसेंदिवस तीव्र रुप धारण करत असल्याचं दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 07, 2025 | 02:44 PM
Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळ नामांतरण प्रश्नावर भूमिपुत्र आक्रमक; पायी चालत करणार आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मुंबई विमानतळ नामांतरण प्रश्नावर भूमिपुत्र आक्रमक
  • दिबा पायी दिंडी मार्ग ठरला
  • चार दिवस चालत गाठणार विमानतळ
संतोष पेरणे: नवी मुंबई विमानतळ नामांतरणाचा वाद काही मिटता मिटेना झाला आहे. हा वाद आता दिवसेंदिवस तीव्र रुप धारण करत असल्याचं दिसत आहे.
लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास दिले जात नाही.त्यामुळे चार जिल्ह्यातील भूमिपुत्र एकवटले असून 22 डिसेंबर पासून दिबा पायी दिंडी भिवंडी येथून निघून विमानतळ येथे धडक देणार आहे.त्या निमित्ताने या पायी दिंडीचे मार्ग आक्रोश दिंडीचे समन्वयक निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत जाहीर केला.

शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय दि.बा. पाटील यांच्या माध्यमातून राज्यसरकारने घेतला होता. तर राज्यात स्त्री भ्रूण हत्या आणि कुळ कायदा बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे  दि. बा. पाटील यांचे योगदान नवीन मुंबई शहराच्या उभारणीत आहे. त्यामुळे नवी मुंबई येथे तयार झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यास देण्यात यावे ,अशी मागणी गेली दहा वर्षे केली जात आहे.या मागणीच्या निमित्ताने राज्य सरकारने आपला ठराव केंद्र सरकारला दिला आहे.

“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

मात्र केंद्र सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे अनेक आंदोलनं उभी राहिली मात्र सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यात या विमानतळावरून या महिन्यात उड्डाण सुरू होणार असल्याने भूमिपुत्र अधिक आक्रमक झाले आहेत. या भूमिपुत्रांकडून आंदोलने वेळोवेळी करण्यात आली असून आता हे आंदोलन खासदार सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा यांनी हातात घेतले आहे. त्यानुसार कार रॅलीनंतर आता आरपारची लढाई लढली जात असून खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली दिबा पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे.भिवंडी येथील मानकोली नाक्यापासुन निघणारी ही पायी दिंडी ठाणे अशी ऐरोली वरून ठाणे पनवेल राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने विमानतळ येथे धडक देणार आहे.

रॅलीचं स्वरुप कसं असेल ?

या रॅलीचे मार्गाबाबत आक्रोश रॅलीचे समन्वयक आणि नवी मुंबई आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत माहिती दिली.भिवंडीचे मानकोली नाका येथून 22 डिसेंबर रोजी सकाळी पायी दिंडी विमानतळ कडे मार्गस्थ होईल.त्यात सुरुवातीला किमान 25 हजार भूमिपुत्र सहभागी झालेले असतील आणि भिवंडी येथून निघालेली पायी दिंडी दुपारच्या भोजनासाठी खारेगाव ठाणे येथे विसावा घेईल.नंतर ठाणे शहरातून ही पायी दिंडी सायंकाळी 15 किलोमीटर अंतर पार करून ऐरोली येथे मुक्कामासाठी थांबणार आहे.

दिंडीत चालणाऱ्या महिलांना सायंकाळी आपल्या घरी पोहचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था असणार आहे. ऐरोली येथून ही पायी दिंडी 23 डिसेंबर रोजी सकाळी सुरू होईल आणि पुढे दुपारी 15 किलोमीटर अंतर पार करून सीबीडी येथे मुक्काम करेल.तर 24 डिसेंबर रोजी अंतिम पडाव पार करण्यासाठी रायगड,ठाणे,पालघर,मुंबई जिल्ह्यातील भूमिपुत्र हे हजारांचे संख्येने तयार असतील.नवी मुंबई मधील दोन दिवसांचा मुक्काम यांची सर्व व्यवस्था नवी मुंबई भूमिपुत्र यांनी घेतली आहे.तर जागोजागी पाण्याची व्यवस्था केली जात असून पायी दिंडीत दररोज 15 किलोमीटर अंतर पार करण्याचे नियोजन असून खासदार सुरेश म्हात्रे आणि समाजातील आजी माजी पदाधिकारी हे पायी दिंडीत चालणार आहेत.

सरकारकडून निर्णयाची अपेक्षा

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यास लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव घेतला आहे.मात्र केंद्र सरकार कडून मागील दोन वर्षापासून कोणत्याही हालचाली होत नाहीत.त्यामुळे भूमिपुत्र लोकनेते दि बा पाटील यांच्या नावासाठी आक्रमक झाला आहे.ही परिस्थिती लक्षात घेऊन आणि आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्या निवडणुकीच्या मतांवर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार कडून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Accident News: घोडबंदरवर १० महिन्यांत १८ जण बळी, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मृत्यू : उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणाचा वाद नेमका काय आहे?

    Ans: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी भूमिपुत्र व स्थानिक समाजाची गेली दहा वर्षांपासून मागणी आहे. राज्य सरकारने या मागणीला मान्यता देत ठराव केंद्राकडे पाठवला असला तरी केंद्र सरकारकडून निर्णय होत नसल्याने वाद चिघळत आहे.

  • Que: दि. बा. पाटील कोण होते आणि नाव देण्याची मागणी का?

    Ans: दि. बा. पाटील हे कोकण, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांचे लोकप्रिय नेते होते. त्यांचे प्रमुख योगदान: शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन मिळवून देण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, कुळकायदा यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर ते आघाडीवर होते. नवी मुंबई शहर उभारणीदरम्यान स्थानिकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. या सर्व कारणांनी स्थानिक नागरिक विमानतळाला त्यांचे नाव द्यावे यावर ठाम आहेत.

  • Que: दिंडीत किती लोक सहभागी होणार आहेत?

    Ans: सुरुवातीला किमान 25 हजार भूमिपुत्र पायी दिंडीत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. पुढील टप्प्यात संख्येत मोठी वाढ होणार आहे.

Web Title: Navi mumbai natives aggressive on navi mumbai airport renaming issue will protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष
1

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार
2

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत सायबर गुन्हेगारांचा कहर; खारघरमधील 80 वर्षीय वृद्धाची 4.38 कोटींची ऑनलाईन फसवणूक
3

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत सायबर गुन्हेगारांचा कहर; खारघरमधील 80 वर्षीय वृद्धाची 4.38 कोटींची ऑनलाईन फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.