Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

Amit Thackeray: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुण्यातील महाविद्यालयीन दौऱ्यादरम्यान सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो खाली उतरवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 31, 2026 | 02:43 PM
पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • शिवरायांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला?
  • अमित ठाकरेंचा सवाल
  • मनसे कार्यकर्त्यांनी क्षणात फोटो उतरवला
Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या पुणे दौऱ्याची सुरुवातच एका वेगळ्या वादामुळे चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे आज (31 ऑगस्ट 2026) शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचले. मात्र, प्राचार्यांच्या कार्यालयातील नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून यावेळी नवा वाद निर्माण झाला.

कँटिनपासून खेळाडूंच्या प्रशिक्षकापर्यंत विचारला जाब

महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. कँटिनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तसेच स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळालेल्या खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा का उपलब्ध होत नाहीत, याबाबत त्यांनी प्राचार्यांकडून माहिती घेतली. याचवेळी एका विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या कार्यालयातील छायाचित्रांकडे अमित ठाकरे यांचे लक्ष वेधले.

Aaple Sarkar Seva Kendra: पुणे जिल्ह्यात १,३७२ नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांना मंजुरी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत!

‘शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला?’

शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते. ते पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी लावण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर लगेच उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या ठिकाणाहून खाली उतरवले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

सात महाविद्यालयांना भेट देणार अमित ठाकरे

अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा आहे. पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना ते भेट देणार असून विशेषतः Gen Z विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे.

‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’सह विविध उपक्रम

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा मांडण्यासाठी ‘रक्षाबंधन’ उपक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. वाडिया महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसमोर उघडपणे होणाऱ्या सिगारेट आणि गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी केली जाणार आहे. याशिवाय माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याचाही दौऱ्यात समावेश आहे. एकीकडे अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे सरकारी महाविद्यालयातील नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यात आल्याने या दौऱ्याला राजकीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

Web Title: Amit thackeray on pm modi photo at government polytechnic pune mns workers remove portrait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • narendra modi
  • Pune

संबंधित बातम्या

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
1

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
2

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
3

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू
4

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.