Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी

मूर्धा, मुर्दापूरवा, नवघर आणि घोडदेव परिसरातील भूमिपुत्रांची घरे पाडून त्यांचा इतिहासच पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काच्या जागेतून हद्दपार होऊ देणार नाही, असा इशारा देखील सरनाईक यांनी दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2026 | 09:23 AM
Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • मूर्धा गावातील भूमिपुत्रांच्या घरांवरील कारवाईला आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध केला.
  • ३ सप्टेंबरला वरिष्ठ अधिकारी मूर्धा परिसराची पाहणी करून घरांवरील कारवाई व मालकी हक्कांचा आढावा घेणार आहेत.
  • जुन्या घरांचा विस्तार करण्यासाठी महापालिका आयुक्तांना विशेष अधिकार देण्याची सरनाईक यांची मागणी आहे.
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील मूर्धा गावात स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. जुनी कोळीवाडी, आगरी-कोळी समाजाची घरे तसेच आदिवासी पाड्यांवरील घरांवर थेट हातोडा चालवून ती उध्वस्त करणे अन्यायकारक असल्याची भूमिका शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काच्या जागेतून हद्दपार होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा

मूर्धा, मुर्दापूरवा, नवघर आणि घोडदेव या परिसरात आगरी समाजासह मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज वास्तव्यास आहे. या परिसराचा इतिहास पोर्तुगीज काळापासूनचा असून घोडबंदर किल्ल्याशी संबंधित सुमारे चारशे ते साडेचारशे वर्षांचा इतिहास असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील भूमिपुत्रांची घरे पाडून त्यांचा इतिहासच पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरनाईक म्हणाले की, पूर्वीच्या काळात या गावांमध्ये जागा अत्यंत कमी होती. संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत गेल्याने अनेक भूमिपुत्रांनी आपल्या जुन्या घरांमध्ये स्वतःच्या कुटुंबासाठीच वाढीव बांधकाम केले आहे. ही घरे व्यावसायिक उद्देशाने बांधून विकली जात नसताना केवळ अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली कारवाई करणे योग्य नाही. अशा कुटुंबांना संरक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

या प्रश्नावर आपण केलेल्या तक्रारीची नगरविकास विभागाने दखल घेतली असून ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी, वन विभाग, महसूल विभाग तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

या दौऱ्यात जुनी कोळीवाडी, आदिवासी पाडे, जमिनींचे मालकी हक्क, वन विभागाशी संबंधित अडचणी तसेच जुन्या घरांबाबतच्या समस्या यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. पाहणीनंतर अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाईल. त्यानंतर जुन्या कोळीवाड्या आणि आदिवासी पाड्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

“भूमिपुत्रांना शहराबाहेर काढण्याचा प्रयत्न सहन करणार नाही”

“आगरी-कोळी आणि आदिवासी हे मीरा-भाईंदरचे मूळ भूमिपुत्र आहेत. काही लोक त्यांना शहराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही,” अशी भूमिका सरनाईक यांनी व्यक्त केली. गेली १७ वर्षे आपण या शहराचे आमदार म्हणून काम करत असून या भूमिपुत्रांच्या पाठिंब्यामुळेच आपण आज आमदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली असून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनुसार भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण ही भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“घर वाढवण्यासाठी आयुक्तांना अधिकार द्या”

जुन्या गावठाणांमध्ये रस्ते आणि मोकळी जागा अत्यंत मर्यादित असल्याने UDCPRच्या सध्याच्या निकषांनुसार अनेक ठिकाणी नव्याने बांधकाम किंवा घराचा विस्तार करणे शक्य होत नाही. काही भागांमध्ये रुग्णवाहिका, रिक्षा किंवा अगदी दुचाकी नेण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याची वस्तुस्थिती सरनाईक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यामुळे नकाशे मंजूर करण्याच्या सर्वसाधारण प्रक्रियेऐवजी ज्या कुटुंबाचे ते जुने घर आहे, त्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून, कुटुंबाची गरज लक्षात घेऊन घर वाढवण्याची परवानगी देण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. अशा पद्धतीने परवानगी दिल्यास भूमिपुत्रांच्या घरांवर केवळ ‘अनधिकृत बांधकाम’ म्हणून कारवाई करण्याची वेळ येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आरक्षित जागेवरूनही महापालिकेवर आरोप

दरम्यान, परिसरातील आरक्षित जागांच्या मुद्द्यावरूनही सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर निशाणा साधला. विकास प्रकल्पातील आरक्षणाच्या जागेचा ठरावीक हिस्सा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणे अपेक्षित असताना संबंधित जागा अनेक वर्षे ताब्यात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी

गार्डनच्या आरक्षणातील जागेचा काही भाग विकासकाला आणि उर्वरित हिस्सा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होण्याची प्रक्रिया असताना ती जागा पालिकेने तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधांपासून वंचित ठेवले जात असून भविष्यात गार्डन उभारले जाईल, असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचेही त्यांनी सांगितले.

भूमिपुत्रांच्या जुन्या घरांवरील कारवाई, गावठाणांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आणि आरक्षित जागांचा ताबा या तिन्ही मुद्द्यांवर आता शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्याने ३ सप्टेंबरच्या पाहणी दौऱ्याकडे मीरा-भाईंदरमधील भूमिपुत्रांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pratap sarnaik opposes action against homes of bhumiputra in mira bhayandar senior officials to inspect on september 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • mira bhayandar
  • NAVARASHTRA
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा
1

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता
2

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
3

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर
4

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.