Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमच्या नादात लागू नका’, मनसे नेते राजू पाटील यांचा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना थेट इशारा

कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अलीकडेच एक वक्तव्य केले होते. मात्र आता नंदू परब यांच्या या वक्तव्यावर राजू पाटील यांनी थेट सवाल उपस्थित केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 09:23 AM
'आमच्या नादात लागू नका', मनसे नेते राजू पाटील यांचा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना थेट इशारा

'आमच्या नादात लागू नका', मनसे नेते राजू पाटील यांचा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना थेट इशारा

Follow Us
Follow Us:
  • राज ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याच्या नंदू परब यांच्या अधिकारावर राजू पाटील यांनी थेट सवाल उपस्थित केला.
  • परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असा टोला लगावत ‘जो इथे राहतो तो आपला’ अशी भूमिका राजू पाटील यांनी मांडली.
  • दिव्यातील अनधिकृत रिक्षांच्या मुद्द्यावरून त्यांनी इशारा देत, ‘आमच्या नादाला लागू नका, नाहीतर सगळं बाहेर काढू,’ असे म्हटले.
भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्या नावाचा उल्लेख करीत कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर राजू पाटील यांनी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा चांगला समाचार घेतला. “राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायची त्यांची औकात आहे का?” असा थेट सवाल राजू पाटील यांनी केला. कल्याण ग्रामीणमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात मनसे नेते राजू पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी नंदू परब यांच्या चांगला समाचार घेतला.

Mira Bhayandar : गणेशोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात बंद AC; प्रताप सरनाईक संतापले, ‘पालिकेला 100 रुपयांची मनीऑर्डर पाठवतो’

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याच्या प्रवृत्तीवर टीका करत, “दुसऱ्या पक्षात हे चालत असेल, पण आमच्या पक्षाला याची लागण लागू नये,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, दिव्यात अनधिकृत रिक्षांचा मुद्दाही राजू पाटील यांनी उपस्थित केला. आमच्या नादी लागू नका; नाहीतर सगळं बाहेर काढू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. हर्षद पाटील यांच्याबाबत बोलताना राजू पाटील म्हणाले की, “हर्षद पाटील हा फक्त पदाधिकारी नाही, माझा भाऊ आहे.”

नेहरू मैदान कोणाला देण्यात आलं? ते अधिकृत आहे का? सावरकर उद्यानात कार्यालय अधिकृत आहे का? असे सवाल उपस्थित करत राजू पाटील यांनी नंदू परब यांना “पक्षाच्या प्रश्नाला पक्षाच्या पद्धतीने उत्तर द्या; वैयक्तिक बोलाल तर उत्तरही वैयक्तिक येईल,” असा इशारा दिला आहे. आमच्या नादात लागू नका असा थेट इशारा मनसे नेते राजू पाटील यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना दिला आहे.

‘त्यांच्या व्यासपीठावर बसलेला त्यांचा पदाधिकारी दिना दुबे म्हणजेच दिनेश दुबे माझा चांगला मित्र आहे. हा शुद्ध मराठी बोलतो आणि आगरी पण बोलतो. त्याला आपण आपला मानत नाही का? परंतु परप्रांतीयांमध्ये फूट टाकायची, राजकारण करायचं आणि बाकीच्या गोष्टी करायच्या, हे खेळ बाकीच्या पक्षात होतात, परंतू आपल्या पक्षात त्याची लागण लागता कामा नये. आपल्या पक्षात येतील त्याचं स्वागत आहे, आपल्या पक्षाचे ध्येय धोरण ज्यांना मान्य असतील त्यांचं स्वागत आहे, जो इथे राहतो तो आपला आहे.’, असे राजू पाटील म्हणाले.

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

‘आता दिव्यात इतक्या रिक्षा चालू आहेत, त्यांनी बघितलं आहे का अनधिकृत रिक्षा किती आहेत. आमच्या नादाला लागले तर त्याचं सर्व बाहेर काढू’, असा थेट इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. राजू पाटील म्हणाले की, ‘नंदू परबला माझं सांगणं आहे की हर्षद पाटील हा माझ्या पक्षाचा सहकारी असला तरी तो माझा भाऊ आहे. रवींद्र चव्हाण यांना माझं सांगणं आहे की आवरा हे आता. सकारात्मक राजकारण करा. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही काम केली असतील तर तुम्हाला नाही विचारणार तर कोणाला विचारणार.’

Web Title: Raju patil slams nandu parab over remarks on raj thackeray and warns bjp leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • MNS
  • NAVARASHTRA
  • raju patil

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास
1

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास

अयोध्येनंतर आता काशी मंदिरात सोने चोरी! तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरु
2

अयोध्येनंतर आता काशी मंदिरात सोने चोरी! तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरु

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण
3

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार
4

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.