Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: महिला आशिया कप २०२६: भारताचा विजयाने श्रीगणेशा

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रासह , देश आणि विदेशातील राजकारण, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि क्रीडा क्षेत्रातील प्रमुख घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 10:04 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today

Maharashtra Breaking News Today

Follow Us
Follow Us:
  • 31 Aug 2026 10:04 AM (IST)

    31 Aug 2026 10:04 AM (IST)

    तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ट्विंकल खन्नावर परिणाम; डिंपल कपाडियासोबत घरातच बनवतेय पनीर

    महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांसह सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट्सविरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यांच्या या धडक कारवाईला कलाकार मंडळींकडूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मध्यंतरी त्यांनी भेसळयुक्त पनीरच्या उत्पादनाविरोधातही मोठी कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाईनंतर आता अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही आपल्या अनुभवाबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. ट्विंकल आणि तिची आई डिंपल कपाडिया यांनी बाहेर पनीर खाण्याऐवजी आता घरच्या घरी पनीर बनवण्यास सुरुवात केली आहे.

  • 31 Aug 2026 09:45 AM (IST)

    31 Aug 2026 09:45 AM (IST)

    MNS-BJP Politics: आमच्या नादात लागू नका; राजू पाटलांचा भाजपला इशारा 

    भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्या नावाचा उल्लेख करीत कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर राजू पाटील यांनी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा चांगला समाचार घेतला. “राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायची त्यांची औकात आहे का?” असा थेट सवाल राजू पाटील यांनी केला. कल्याण ग्रामीणमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात मनसे नेते राजू पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी नंदू परब यांच्या चांगला समाचार घेतला.

     

  • 31 Aug 2026 09:35 AM (IST)

    31 Aug 2026 09:35 AM (IST)

    Pune Chakan Traffic:  चाकणमधील वाहतूक कोंडी अन् खड्ड्यांवर जिल्हाधिकारी आक्रमक 

    Pune Chakan Traffic:  पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील दयनीय रस्ते, सततची वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर प्रशासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रस्ते दुरुस्ती, अतिक्रमणे हटवणे आणि वाहतूक नियोजनाबाबत संबंधित यंत्रणांना कडक इशारा दिला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवून तातडीची दुरुस्ती कामे पूर्ण करा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  • 31 Aug 2026 09:25 AM (IST)

    31 Aug 2026 09:25 AM (IST)

    Abhijeet Dipke on Mohan Bhagwat: ‘भाजपने मोहन भागवतांचे ऐकावे’; आरएसएस प्रमुखांच्या विधानानंतर अभिजीत दीपकेंचा टोला

    Abhijeet Dipke on Mohan Bhagwat: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. सत्ताधारी भाजप स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा (RSS) मोठा समजू लागला आहे, असा आरोप करत त्यांनी भाजपला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकण्याचा सल्ला दिला.

    न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते की, “ज्या हिंदूचा असा विश्वास आहे की मुस्लिमांनी भारतात राहू नये, तो मुळातच स्वतःला हिंदू मानू शकत नाही.” भागवत यांच्या याच विधानाचा संदर्भ देत अभिजीत दीपके यांनी भाजपवर पुन्हा एकदा राजकीय टोलेबाजी केली.

  • 31 Aug 2026 09:10 AM (IST)

    31 Aug 2026 09:10 AM (IST)

    Mumbai Politics: शिंदे गटाला सव्वा वर्षाचे महापौरपद मिळण्याची शक्यता

    Mumbai Politics: मुंबईच्या राजकारणात लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशियातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगपालिकेच्या महापौरपदाबाबत नवा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी 'सव्वा-सव्वा वर्षांचा' फॉर्म्युला ठरला असून त्यानुसार महापौरपद शिंदे गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे.

  • 31 Aug 2026 09:00 AM (IST)

    31 Aug 2026 09:00 AM (IST)

    Kailash Mansarovar Nepal Flood: नेपाळच्या महापुरात ताटातूट झाल्यानंतर मुंबई विमानतळावर भावा-बहिणीची भेट 

    Kailash Mansarovar Nepal Flood: नेपाळमधील महापुरात ताटातूट झालेल्या भावा-बहिणीची रविवारी मुंबई विमानतळावर ताटातूट संपून भेट झाली आणि त्यांनी अत्यंत भावूक वातावरणात अनोखे रक्षाबंधन साजरे केले. अलका कीर्तीरामन आणि राकेश मेहता यांनी एकत्र कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात केली होती. मात्र, अलका यांची प्रकृती बिघडल्याने त्या वरपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. दरम्यान, २६ ऑगस्टला नेपाळमध्ये आलेल्या अचानक महापुरामुळे सुरक्षित जागी हलवताना दोघांचा प्रवास वेगवेगळ्या मार्गाने सुरू झाला. रविवारी विमानतळावर भेट होताच अलका यांनी आपल्या भावाला राखी बांधून या खडतर प्रवासाला सुखद पूर्णविराम दिला.

Maharashtra to National And International Breaking News: 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. नेपाळ आणि तिबेट सीमेवरील भीषण ढगफुटी आणि महापुरातील मृतांचा आकडा ५७० पार गेला असून, महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित आणण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप असली तरी उत्तर आणि पूर्व भारतातील नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भागात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मर्यादित फेरबदलासह सावध पातळीवर व्यवहार करत आहेत.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात तब्बल १३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करत पुनरागमन केले आहे. महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली आहे.

 

 

Web Title: Maharashtra national to international breaking news in marathi 31 august 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

रुग्णालयांची दर सहा महिन्यांनी सुरक्षा तपासणी! आगीचा धोका; अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी, अमरावती घटनेनंतर यंत्रणेला जाग
1

रुग्णालयांची दर सहा महिन्यांनी सुरक्षा तपासणी! आगीचा धोका; अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी, अमरावती घटनेनंतर यंत्रणेला जाग

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…
2

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार
3

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क
4

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.