Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Eknath Shinde : शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित करण्यात आला असून तो गोरेगाव येथील नेस्को येथे पार पडणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 15, 2026 | 06:10 PM
Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Follow Us
Follow Us:
  • यंदाचा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित
  • शेतकऱ्यांच्या मुलांना सायकलचे वाटप
  • दुष्काळग्रस्त भागात विविध उपक्रम
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांसाठी समर्पित केला आहे. पक्षाकडून गुरुवारी दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज करण्यात आला.
या टिझरमध्ये दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, भगवा खांद्यावर घेऊन शिवसैनिक बांधावर जाईल. परिस्थिती गंभीर आहे पण पाठीशी उभा राहणारा शिवसैनिक खंबीर आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे मुख्ये नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
येत्या मंगळवारी, 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता गोरेगावमधील नेस्को येथे शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या पत्नींना शिलाई मशीनचे वितरण

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच म्हटले आहे. संकटग्रस्त शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी शिवसेनेकडून वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरु आहे.
शिवसेनेकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना 25 हजार सायलकलींचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पत्नींना 25 हजार शिलाई मशीनचे वितरण सुरु आहे. त्याशिवाय दसऱ्यापूर्वीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचे वाटप आणि आनंदाचा शिधा शिवसेनेकडून वितरित केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात दुष्काळातील शिवसेनेच्या मदतीबाबत सविस्तर बोलणार आहेत. या मेळाव्यात त्यांच्याकडून शिवसैनिकांना दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करणारा राज्यस्तरीय कार्यक्रम दिला जाईल.

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा

शिवसेनेचा राज्यभर उपक्रम

गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पूर संकटात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. दसऱ्याचे तोरण लावण्यासाठी शिवसैनिक शेतकऱ्यांच्या घरी गेले होते. लाडक्या बहिणींसाठी पक्षाने मदतीचा हात पुढे केला होता. दसऱ्यापूर्वीच अन्नधान्याची पाकिटे शिवसेनेने शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवली होती.
यंदाही बळीराजा संकटात असून त्यासाठी शिवसेना राज्यभरात विविध उपक्रम राबवत आहे. दुष्काळग्रस्तांना समर्पित केलेल्या दसरा मेळाव्यातून शिवसेनेची शेतकऱ्यांविषयीची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडणार आहे.

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवसेनेचा २०२६ चा दसरा मेळावा कोणाला समर्पित करण्यात आला आहे?

    Ans: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला आहे.

  • Que: शिवसेनेचा दसरा मेळावा कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: दिलेल्या बातमीनुसार, दसरा मेळावा २० ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता गोरेगाव येथील नेस्को येथे आयोजित करण्यात आला आहे.

  • Que: शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिवसेनेकडून कोणता उपक्रम राबवण्यात येत आहे?

    Ans: शेतकऱ्यांच्या मुलांना २५ हजार सायकलींचे वाटप करण्यात येत असल्याचे बातमीत नमूद केले आहे.

Web Title: Shivsena dasara melava 2026 drought affected farmers eknath shinde rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
1

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
2

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
3

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
4

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.