Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus News : एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार

एसटी महामंडळाच्या डिझेल खर्चात बचत करण्याच्या प्रयत्नांना अर्थ खात्याने अडथळा आणला असून गुजरातमधून डिझेल खरेदीस परवानगी नाकारली आहे. त्यामुळे डिझेल टंचाई निर्माण होऊन प्रवासी व चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2026 | 11:40 AM
एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार

एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या डिझेलखर्च बचतीला अर्थ खात्याचा खोडा
  • गुजरात वरून डिझेल घेण्यास परवानगी नाही
  • डिझेल शॉर्टेजमुळे प्रवासी व चालकांचे हाल, उत्पन्नात घट
मुंबई : एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी गुजरात मधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.पण राज्य सरकारच्या अर्थ खात्याने गुजरातमधून डिझेल खरेदी करण्यास अद्याप परवानगी दिल नाही. डिझेल अभावी राज्यातील ५५ आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी प्रवासी आणि चालक या दोघांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

पुणेकरांची ‘गॅस’कोंडी! बुकिंग करूनही सिलिंडरचा पत्ता नाही; वितरण व्यवस्था कोलमडली

एसटीला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर इतके डिझेल लागत असून इंधनावर वर्षाला सरासरी ३ हजार ४०० कोटी रुपये इतका खर्च होत आहे. एसटीच्या प्रवासी उत्पन्नात सुद्धा अपेक्षित वाढ होत नसल्याने व मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात मध्ये मूल्यवर्धित कर कमी असल्याने डिझेल स्वस्त आहे. महामंडळाच्या फायद्याचा दृष्टीने गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी घेतला होता. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे गुजरात मधून डिझेल खरेदी करण्याची परवानगी मागितली होती. पण अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी त्याला अद्यापी हिरवा कंदील दाखवला नसून पूर्वीची पुरवठादार कंपनी बी पी सी एल चा करार संपल्याने त्यांनी एक महिन्यापासून डिझेल देणे बंद केल्याने, फेऱ्या उशिरा जात आहेत.

काही विभागात प्रस्तावित किलो मीटर रद्द होत असल्याने त्याचा परिणाम प्रवासी उत्पन्नावर झाला असून हंगामी भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. साधारण १५ टक्के प्रवासी उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून ऐन हंगामात एसटीचे आर्थिक नुकसान झाले आहे. याला निव्वळ राज्य सरकारचे अर्थ खाते जबाबदार असून राज्याचे मुख्यमंत्री, तथा अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्ती करून तात्काळ उचित निर्णय घ्यावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

ऐन उन्हाळ्यात चालकांना त्रास

एसटीकडे एकूण २५१ डिझेल पंप असून त्यातील १९६ आय ओ सी चे व ५५ बी पी सी एल चे आहेत. बी पी सी एल चे कंत्राट संपल्याने ५५ डिझेल पंप गेले महिनाभर बंद आहेत. ज्या आगारातील पंप बंद आहेत , तिथल्या गाड्यांना दुसऱ्या आगारात डिझेल भरण्यासाठी जावे लागत आहे. ते दूरवर आहेतच पण तिथे गाड्या वाढल्याने मोठ्या रांगा लागत आहेत.गाडी घेऊन चालकांना तासनतास रांगेत राहून डिझेल भरावे लागत आहे . या प्रकारामुळे ऐन उन्हाळ्यात चालकांना शारीरिक व मानसिक ताण त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Web Title: St diesel cost saving plan blocked finance department no permission gujarat diesel shortage impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • msrtc
  • Shrirang Barge
  • st bus
  • st mahamandal

संबंधित बातम्या

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
1

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
2

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.