Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees : एसटीच्या आर्थिक संकटात ८६ हजार कर्मचाऱ्यांची देणी रखडली; परिवहन मंत्र्यांकडे निवेदन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८६ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे ७,५०० कोटी रुपयांची विविध देणी थकीत असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2026 | 01:11 PM
एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला 'हा' इशारा

एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला 'हा' इशारा

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत देणी रक्कम ७५०० कोटींवर
  • एक वेळचा पर्याय म्हणून शासनाने अर्थ सहाय्य करावे
  • श्रीरंग बरगे यांची मागणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८६ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध देणी रक्कम अंदाजे ७,५०० कोटी रुपये इतकी थकित असून एस्. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली असल्याने सदर रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एसटीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे एक वेळचा पर्याय म्हणून शासनाने अर्थ सहाय्य करावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. यावेळी श्रीरंग बरगे यांनी आज (19 जून 2026) एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भातील निवेदन देण्यात आले.

MSRTC News : अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम; १५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात ४३.८३ कोटींची वाढ, रोज ३ कोटींचा फायदा

थकबाकीचा तपशिल

सन २०१६-२०२० या कालावधीतील १% वार्षिक वेतनवाढीचा दर रक्कम मिळालेली नाही. त्याची अंदाजे सरासरी १६०० कोटी रुपये इतकी रक्कम थकीत असून ती देण्यात यावी.थकित महागाई भत्ता व घरभाडे भत्ता याचा फरक रक्कम अशी एकूण ९७० कोटी रुपये इतकी रक्कम थकीत असून ती देण्यात यावी. भविष्य निर्वाह निधी, अंशदान व वर्गणी १४०० कोटी थकित असून ती ट्रस्टला भरण्यासाठी देण्यात यावी.उपदान विश्वस्त मंडळ अंशदान ट्रस्टची १४०० कोटी रुपयांची देणी रक्कम थकीत असून ती देण्यात यावी.कर्मचारी, अधिकारी रजा रोखीकरण प्रलंबित रक्कम रुपये ६० कोटी इतकी असून ती देण्यात यावी.मेडीकल व प्रवास भत्ता यावी रुपये १२ कोटी इतकी रक्कम थकीत असून ती देण्यात यावी.

डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत वेतन देण्यात आले असले तरी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात आले नसून नक्त वेतन देण्यात आलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची विविध देणी संबंधित संस्थांकडे भरणा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आलेल्या तुटीची रक्कम ६३३ कोटी रुपये इतकी असून ती रक्कम देण्यात यावी. इतर देणी व सि.टी.सी. अशी एकुण ४१८ कोटी रुपये इतकी रक्कम थकीत असून ती देण्यात यावी. अशी एकूण ७ हजार ५०० कोटी रक्कम शासनाने एसटीला दिली तर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल असेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

एसटीची आर्थिक स्थिती चिंताजनक

एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वाढते खर्च, इंधन दरवाढ, प्रवासी उत्पन्नातील घट आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर देणे महामंडळाला शक्य होत नसल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी

श्रीरंग बरगे यांनी राज्य शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. एसटीकडे सध्या इतका मोठा निधी उपलब्ध नसल्याने शासनाने एकवेळचे अर्थसहाय्य देऊन कर्मचाऱ्यांची थकीत देणी निकाली काढावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आता राज्य शासन आणि एसटी प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील हजारो एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

MSRTC Fare Hike : एसटी प्रवाशांना दिलासा नाही! १०% हंगामी भाडेवाढीला आणखी महिनाभर मुदतवाढ

Web Title: St employees pending dues of rs 7500 crore demand for government financial aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
1

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
2

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल
3

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…
4

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.