केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार,मग स्मारक का होत नाही? संभाजीराजे छत्रपतींकडून सवाल उपस्थित (फोटो सौजन्य-X)
मुंबईचा अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारु, अशी स्वप्ने गेल्या तीन दशकात राज्यात अनेक सरकारे दाखवली. 24 डिसेंबर 2016 रोजी भाजप-शिवसेना आघाडी सरकारने अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाचे काम सुरू झाल्याच्या अनेक बातम्या आल्या.
तर दुसरीकडे सरकारी नोंदी किंवा स्मारकांवरही कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही.चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
संभाजीराचे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेसाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे जमले असून यावेळी संभाजीराजे यांनी भाष्य केले.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, मग अरबी समुद्रातील शिवस्मारकचं काय झालं? शिवस्मारकाचा अंदाजे खर्च 70 कोटी आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली तेव्हा आम्हाला आनंद झाला. देशाच्या आर्थिक राजधानीत शिवाजी महाराजांचे सुशोभित स्मारक होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकात जलपूजन केले. केवळ आठ वर्षे उलटूनही शिवस्मारकाचे (शिवाजी महाराज स्मारक) सुरू झालेले नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. हे स्मारक कुठे आहे? त्यामुळे आम्ही स्मारकाचे संशोधन करण्याची मोहीम सुरू केली आहे. सरकारने राज्यातील 13 कोटी जनतेला उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
स्मारकाच्या ठिकाणी असलेले आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. परंतु ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी दिली गेली आहे.