Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून काही जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 02, 2026 | 11:15 AM
राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट
  • आगामी ३ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
  • ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
मुंबई : गेल्या चार दिवसापासून राज्यात वादळी पाऊस आणि गारपीट होत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट गडद झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज २ ते ३ एप्रिल पर्यंत आगामी दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. येथे विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, आणि पुणे या जिल्ह्यांच्या काही भागांत तीव्र हवामानाचा म्हणजे ऑरेंज अलर्ट दिला आहे.

भोंदूबाबा प्रकरणावरुन सपकाळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी, म्हणाले; आता खरातची…

‘यलो अलर्ट’ – वादळी पावसाचा अंदाज

मराठवाडातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. तर ठाणे आणि रायगड: मुंबईच्या बाजूला असलेल्या या जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

गडगडाटाचा (मेघगर्जनेचा) इशारा

संपूर्ण विदर्भ, खानदेश म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक परिसरात पुढील दोन दिवस दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहू शकतो.

किनारपट्टीलाही इशारा

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहू शकत असल्याने मच्छिमार आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान ऑरेंज अलर्ट असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी काढलेला शेतमाल आणि जनावरांची विशेष काळजी घ्यावी. विजा चमकत असताना झाडांचा किंवा पत्र्याच्या शेडचा आसरा घेऊ नका. असें सुचविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे जामवाडी गावात आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामवाडीचे शेतकरी विजय वाडेकर यांनी आपल्या शेतात सुमारे १,८०० आंब्याची झाडे लावली होती. यावर्षी त्यांना सुमारे १० ते १२ टन आंब्याचे उत्पादन अपेक्षित होते, परंतु अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबे जमिनीवर पडले. आता त्यांच्या अंदाजानुसार उत्पादन केवळ १ ते २ टनांपर्यंत घटेल. विजय वाडेकर यांच्या मते, येत्या काही दिवसांत पाऊस आणि जोरदार वारे असेच सुरू राहिल्यास, उरलेले आंबेही पडू शकतात, ज्यामुळे १००% नुकसान होईल. या नुकसानीमुळे सुमारे १.२ दशलक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना हवामानाचा फटका बसण्याची ही पहिली वेळ नाही. सुमारे १० दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देवपिंपळगाव, बदनापूर तालुका आणि शिरसवाडी, जालना तालुका येथील आंबा, डाळिंब आणि द्राक्षांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे फळे गळून पडली, तर उरलेल्या फळांचेही मोठे नुकसान झाले. आता, अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Web Title: Unseasonal rain alert maharashtra orange yellow warning districts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
1

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
2

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
3

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
4

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.