Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांचे नगरसेवकपद अडचणीत आले आहे. पद रद्द करण्यासाठी सदा सरवणकरांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली.

  • By विवेक
Updated On: Aug 25, 2026 | 08:34 PM
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

Follow Us
Follow Us:
  • विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द.
  • नगरसेवकपद रद्द करण्यासाठी सदा सरवणकरांची आयुक्तांकडे भेट.
  • जातपडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी विशाखा राऊत यांना तीन महिन्यांची मुदत.
ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांच्या नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर गुरव, शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले आणि तृष्णा विश्वासराव उपस्थित होते.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सदा सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार असल्याची आपल्याला आधीपासूनच माहिती होती, असा दावा त्यांनी केला.

‘पद जाणार हे आधीच माहिती होतं’

सदा सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्रावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, राऊत यांचे प्रमाणपत्र वैध नसल्याची माहिती आधीपासून होती. त्यामुळे राखीव जागेवरून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचे पद अडचणीत येऊ शकते, याची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.

मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट? लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध

१९९७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत सरवणकर यांनी त्या वेळी मतदारसंघांच्या आरक्षणातील बदलामुळे आपण आणि विशाखा राऊत यांनी वेगवेगळ्या जागांवरून निवडणूक लढवल्याचे सांगितले.

विशाखा राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सरवणकर यांच्यावर आपल्या नगरसेवकपदाबाबत आधीच वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. तसेच जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणल्याचा दावाही त्यांनी केला होता. या आरोपांवर सरवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘नियमानुसारच कारवाई होणार’

शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. महापालिका प्रशासनाकडून पुढील कारवाई नियम आणि कायद्यानुसारच केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कोण कोणत्या भूमिका मांडत आहे यापेक्षा संबंधित कायदे आणि महापालिकेचे नियम महत्त्वाचे आहेत. त्यानुसारच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

नगरसेवकपदाचा निर्णय महापालिका घेणार

पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद कायम राहणार की रद्द होणार, याबाबत आता महापालिका स्तरावर पुढील प्रक्रिया होणार आहे.

जातपडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी विशाखा राऊत यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत त्या कोणती कायदेशीर पावले उचलतात आणि महापालिका प्रशासनाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vishakha raut caste certificate cancelled sada sarvankar bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai News
  • Sada Sarvankar
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Mumbai Crime News: आई-मुलीच्या नात्याला काळिमा; स्वत:च्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो काढले अन्…
1

Mumbai Crime News: आई-मुलीच्या नात्याला काळिमा; स्वत:च्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो काढले अन्…

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा
2

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक
3

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद
4

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.