नागपूर : जिल्ह्यात आता आरोग्य विभागाची चिंता अधिकच वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या पाच रुग्नांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार २९६ वर पोहोचली आहे. बुधवारला शहरात ९ हजार ६५५ तर ग्रामीणमध्ये २ हजार ९३४ अशा एकूण १२ हजार ५८९ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी तब्बल २६.१९ टक्के चाचण्या सकारात्मक आल्या आहे. म्हणजे हा आकडा ३ हजार २९६ वर पोहोचला आहे. यामध्ये शहरातील २ हजार ६७६, ग्रामीणचे ५२९ व जिल्ह्याबाहेरील ९१ जणांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर बुधवारला कोरोनाने घेतलेले पाच बळी ही उच्चांकी कोरोना मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे, आता प्रशासनाला अधिकच सतर्क राहून कार्य करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने सोळा हजाराचा पल्ला गाठला आहे. तसेच, शहरी भागात १३ हजार १३३, ग्रामीणमध्ये २९३९ रुग्ण कोरोनाने संक्रमित आहे. तर, जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या १७० अशी आहे. म्हणजेच सध्या जिल्ह्यात १६ हजार २४२ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये,कोरोना चाचणी सकारात्मक आलेले परंतु, लक्षणे नसलेले सुमारे बारा हजारांहून अधिक रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. तर, गंभीर लक्षणे असलेले रुग्ण मेयो, मेडिकल, एम्ससह इतर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
[read_also content=”नागपूर पोलीस दलातील ३५० जणांना कोरोनाची लागण; पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/nagpur/350-members-of-nagpur-police-force-infected-with-corona-information-of-commissioner-of-police-amitesh-kumar-nrvk-22″]
बुधवारला शहरातील ४ व जिल्ह्याबाहेरील १ अशा पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच एकूण कोरोनाबळींची संख्या १० हजार १४१ वर पोहचली आहे. बुधवारला शहरातील १ हजार ५४, ग्रामीणमधील २३६ व जिल्ह्याबाहेरील ५५ असे १३४५ असे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, जिल्ह्यात कोरोनापासून मुक्तांची झालेल्या रुग्णाची संख्या ४ लाख ९० हजार ८४३ वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी मागील पंधरा दिवसांपासून घसरली आहे.