Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : क्लोरीन वायू गळतीने पुन्हा उडाला थरकाप ;गोधनीनंतर शंकरपूर परिसरातील घटना

Nagpur News : नागपुरात क्लोरीन वायू गळतीची आणखी एक घटना समोर आली आहे. गोधनीनंतर आता शंकरपूर परिसरात क्लोरीन वायू गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 28, 2026 | 03:24 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अग्निशामक दलाने सिलेंडर केला बंद
Nagpur News :
जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन वायूची बारिक गळती झाल्याने शंकरपूर परिसरात काही काळ खळबळ उडाली. गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील गॅस गळतीची घटना ताजी असताना शंकरपूरमध्येही अशीच घटना घडल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे गळती लक्षात आली आणि सिलिंडर बंद केल्याने क्लोरीन वायू मोठ्या प्रमाणात हवेत मिसळण्याचा धोका टळला.

शंकरपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथे प्रक्रिया केलेले पाणी दोन जलकुंभांद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते. केंद्रात क्लोरीन वायूचे दोन सिलिंडर ठेवले होते. त्यापैकी एक वापरात तर दुसरा राखीव होता. गुरुवारी वापरातील सिलिंडर रिकामा झाल्यानंतर राखीव सिलिंडर जोडला.

Nagpur News : ११५ नागपूरकर नेपाळमध्ये ;मायदेशी निघाले पण बॅक टू काठमांडू

मात्र, काही तासांनंतर सिलिंडरमधून अतिशय बारिक प्रमाणात क्लोरीन वायू गळती सुरू झाली. गोधनी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचारी आधीपासूनच सतर्क होते. घटनेची माहिती तातडीने बेलतरोडी पोलिस आणि अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश अहेर आणि डीबी पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.

Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप

अग्निशमन जवानांनी खबरदारी घेत गळती होत असलेला सिलिंडर बंद केला. सलग दोन जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये क्लोरीन गळतीच्या घटना समोर आल्याने संबंधित केंद्रांमधील सिलिंडर, व्हॉल्व्ह, जोडणी व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे .

Web Title: Nagpur news chlorine gas leak sparks panic again incident in the shankarpur area follows the one at godhani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • gas leak
  • Nagpur District
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : ११५ नागपूरकर नेपाळमध्ये ;मायदेशी निघाले पण बॅक टू काठमांडू
1

Nagpur News : ११५ नागपूरकर नेपाळमध्ये ;मायदेशी निघाले पण बॅक टू काठमांडू

Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप
2

Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
3

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद
4

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.