Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Nagpur News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरातील आदिवासी अपर आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन मंगळवारी पुन्हा चिघळले. अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी बसून चर्चा सुरू केली तेव्हा विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. 'विभाग माणुसकी आणि संवेदनशिलता विसरला..' या भाषेत संतप्त भावना व्यक्त केल्या .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 26, 2026 | 02:50 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अपर आयुक्त प्रश्नांवर निरुत्तर
  • सामाजिक संस्थांकडून जेवण
  • पोलिसांनी बॅरीगेट्स हटवले
Nagpur News :  मुलींना स्वच्छतागृहाचा वापर नाकारला तसेच पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले नाही, असे म्हणत सरकारकडून लेखी पत्र मिळावे, अशी मागणी लावून धरली. सोबतच आदिवासी विकासमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी भूमिका मांडली.

सोमवारी रात्री तीन ते चार तास मुलींना कार्यालयाबाहेर पावसात भिजावे लागले, परिणामी, काल व आज असे दोन दिवस पाच विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर मेयोत उपचार केल्यानंतर सुटी दिली. या मुलीही पुन्हा जोमाने आंदोलनात सहभागी झाल्या. सोमवारी वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थी अपर आयुक्तांसोबत चर्चेसाठी आले होते. मात्र, रात्री १२ पर्यंत त्यांना ताटकळत ठेवले.

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

काही विद्यार्थी आत गेले, काहींना पोलिसांनी बाहेरच रोखून धरले. पाऊस सुरू झाल्यानंतरही त्यांना आत सोडले नाही. त्यामुळे पोलिसांचाही विद्याथ्यांनी निषेध केला. सुमारे तीन तास स्वच्छतागृहासाठी विद्यार्थिनी चाचपडत होत्या. यातच दोन विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. त्यांना मेयोत उपचारार्थ नेऊन परत आणले गेले. मंगळवारीही तीन विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यांनाही मेयोत उपचार करून परत आणले गेले. काही ठिकाणचे आंदोलन स्थगित झाल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्नही केला. १२,५०० पदांची भरती, बिंदुनामावलीतील त्रुटी तसेच डीबीटी योजनेशी संबंधित अडचणी दूर करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.

अपर आयुक्त प्रश्नांवर निरुत्तर

अपर आयुक्त आयुषी सिंह मंगळवारी सायंकाळी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास बसल्या. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना निरुत्तर केले. सिंह या वारंवार त्यांच्या भूमिका बदलत असल्याचा आरोप विद्यार्थिनी करीत होत्या. ३० वर्षांच्या संदर्भातील निर्णय स्थगित केल्याचे सांगगितले. लेखी द्या, आदेश दाखवा यावर विद्यार्थी अडून होते, चर्चा करा, समजून घ्या, यासाठी पाया पडतो, अशी भूमिकाही विद्यार्थी मांडत होते. मात्र, असंवेदनशील अधिकारी व कर्मचारी ऐकण्याच्या मन स्थितीत नसल्यानेच आतमध्ये ठिय्या करावा लागला.

सामाजिक संस्थांकडून जेवण

आंदोलक विद्याश्यर्थ्यांसाठी काही सामाजिक संस्थांकडून जेवण दिले जात आहे. पाण्याचीही व्यवस्था केली जात आहे. बिस्कीट्स, नाश्ता आदीचीही व्यवस्था होती. काही विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून घरोघरी पाठवून दबाव, भीती व चौकशी केली जात असल्याचा आरोपही केला.

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?

पोलिसांनी बॅरीगेट्स हटवले

विद्यार्थ्यांनी ‘आम्ही गुंड प्रवृत्तीचे आहोत का, कार्यालय आदिवासी विद्याथ्यांच्या हक्काचे आहे, आम्ही येणारच’ अशी भूमिका मांडत बॅरिकेट्सवर तीव्र नापसंती व्यक्त केली. अखेर अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी पोलिसांना बॅरिकेट्स हटवण्यास सांगितले.

Web Title: Nagpur news students outraged over girls restrooms demand ministers resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Maharshtra news
  • Nagpur News
  • Student Protest

संबंधित बातम्या

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद
1

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ
2

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा
3

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा

Navi Mumbai: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक
4

Navi Mumbai: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.