नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे विद्यापीठात सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. संशोधन सल्लागार समितीच्या सदस्यांच्या काळ्या करतुदी पुढे आल्य. या समिती समोर (आरएसी) लघुशोधप्रबंध सादर करणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. तरी, त्याची तक्रार करण्यात आली आहे. तर, आरएसी मधील एका सदस्याने प्रबंध मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचेही तक्रारीत केली आहे.
[read_also content=”नागपूर हादरले, मोकळ्या मैदानात सापडले ४ अर्भक कुठून आले ? कुणी टाकले असंख्य प्रश्न ? https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/nagpur-trembled-found-in-the-open-field-4-infants-came-from-where-numerous-questions-asked-by-someone-nraa-252560.html”]
या वर्षी पेट नंतर विविध संशोधन केंद्रावर आरएसी पार पडली. त्यात विद्यापीठाच्या एका संशोधन केंद्रावर दोन विद्यार्थिनींनी आपला विषय ठेवला. तेव्हा त्यांना शारीरिक सुखाची मागणी करण्यात आल्याचा आरोपही या विद्यार्थिनींनी केला आहे. अत्यंत धक्कादायक आणि लांच्छनास्पद प्रकार असल्याने या गंभीर प्रकाराची विद्यापीठ प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी सिनेट बैठकीत केली आहे.
[read_also content=”वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हा केंद्र सरकार व संसदेचाच अधिकार, ११ मार्चला नागपूर केंद्र सरकार कार्यालयापुढे निदर्शने https://www.navarashtra.com/chandrapur/vidarbha/chandrapur/the-formation-of-a-separate-vidarbha-state-is-the-prerogative-of-the-central-government-and-parliament-nraa-252645.html”]