Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर-वैनगंगा मार्गाचा कायापालट; 42 किमीचा सिक्स लेन एक्सप्रेस-वे, विस्ताराला गती

स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी पेडेस्ट्रियन अंडरपास, तर हलक्या वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी व्हेइकल अंडरपास बांधले जाणार आहेत. यामुळे प्रमुख जंक्शनवरील वाहतूक सिग्नलमुक्त होण्यास मदत होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2026 | 09:12 AM
नागपूर-वैनगंगा मार्गाचा कायापालट; 42 किमीचा सिक्स लेन एक्सप्रेस-वे, विस्ताराला गती

नागपूर-वैनगंगा मार्गाचा कायापालट; 42 किमीचा सिक्स लेन एक्सप्रेस-वे, विस्ताराला गती

Follow Us
Follow Us:

नागपूर : नागपूरला भंडारा, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाच्या विस्ताराला आता गती मिळणार आहे. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील ४९९.८०० ते ५४१.८०० किलोमीटरदरम्यानचा नागपूर-वैनगंगा मार्ग अत्याधुनिक सिक्स लेन एक्सप्रेस-वे म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

तब्बल २५५३.८४ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ४२ किलोमीटरच्या मार्गाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. मंजूर डीपीआर आणि डिझाइननुसार प्रकल्पाच्या कामाला टप्याटप्याने वेग दिला जात आहे. तांत्रिक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरच्या अखेरीस प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. एनएचएआयच्या नियोजनानुसार संपूर्ण प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत

प्रस्तावित एक्सप्रेस-वेवर दोन्ही दिशांना ३-३ लेनचा १०.५ मीटर रुंदीचा मुख्य कॅरेजवे असेल. त्याला २.५ मीटरचा पेव्हड शोल्डर देण्यात येणार आहे. दोन्ही दिशांच्या वाहतुकीमध्ये ५ मीटर रुंदीचा मजबूत मीडियन आणि क्रॅश बॅरियर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांची वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होण्यास मदत होईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गावरील महत्त्वाच्या जंक्शनवर फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

व्हेइकल अंडरपास बांधले जाणार

स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी पेडेस्ट्रियन अंडरपास, तर हलक्या वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी व्हेइकल अंडरपास बांधले जाणार आहेत. यामुळे प्रमुख जंक्शनवरील वाहतूक सिग्नलमुक्त होण्यास मदत होणार आहे. वैनगंगा नदी परिसरासह अन्य जलस्रोतांवरील जुन्या पुलांचे आणि बॉक्स कल्वर्ट्सचे रुंदीकरण तसेच पुनर्बांधणी केली जाणार आहे. निवासी भागांमध्ये ७ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड, ड्रेनेज व्यवस्था आणि अवजड वाहनांसाठी आधुनिक ‘ट्रक ले-बाय’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

फ्लायओव्हर, पादचारी व वाहन अंडरपासची सुविधा

नागपूरला छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालशी जोडणारा हा मार्ग विदर्भासह मध्य भारतासाठी महत्त्वाचा आर्थिक कॉरिडॉर आहे. सध्या अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सिक्स लेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मालवाहतुकीचा वेग वाढण्यासोबतच लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भातील औद्योगिक आणि व्यावसायिक हालचालींनाही मोठी चालना मिळणार आहे.

Highway Fitness Test : काय सांगता? उद्घाटनापूर्वी महामार्गाची होणार ‘फिटनेस टेस्ट’? सुरुवातीचे 3 महिने प्रवासही होणार फ्री

Web Title: Transformation of the nagpur wainganga route a 42 km six lane expressway nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • highway news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
1

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!
2

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा
3

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत
4

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.