नागपूर : राजकीय पक्षाचा विरोध असू शकतो, मनाचा विरोध असू शकत नाही. गडकरीच्या विरोधातील हे माझे वकील आहेत. रश्मी शुकला प्रकरणाच्या वकिलांचा ग्रुपमध्ये ते एक वकील आहेत. वकील आपली केस लढत आहे त्याचा अर्थ लावला जातो का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग लाभलेला आहे आणि म्हणून अशा प्रकरणावर काँग्रेसला आणि नाना पटोलेंना बदनाम करण्याचे षड्यंत्र या पद्धतीने सुरू झाले. सगळीकडे माझे वकील म्हणून टार्गेट केले जाते. यानिमित्ताने काँग्रेसला जय समर्थ मित्रा समर्थनाचा विरोध म्हणून भाजप अशा प्रकारचं षड्यंत्र करते आहे का असा प्रश्न निर्माण होतो. फडणवीस यांनी काय सांगाव. पण मूळ प्रश्न आहे की, मुंबईची ईडी येथे येऊन नागपुरच्या ईडी आणि पोलिसांना न देणे. केंद्रीय पोलिस दलाचा वापर करणे याचा अर्थ मोठा षड्यंत्र येथे झालेला आहे हे लपवता येणार नाही असा देखील आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
[read_also content=”राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लक्षवेधी “एप्रिल फुल” आंदोलन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महागाईचा निषेध करत वाटली कमळाची फुले आणि कापला निषेधाचा केक https://www.navarashtra.com/maharashtra/nationalist-youth-congress-flagship-april-fools-movement-nrab-262689.html”]
दिल्लीमध्ये ट्रेनिंगसाठी सगळ्या पक्षांचे आमदार दिल्लीला जात आहे. केंद्रीय नेतृत्वाला जे काँग्रेस हायकमांड आहे. त्यांना आमच्या आमदारांनी भेटीची वेळ मागितली. यात गैर काय. भाजपमध्ये मोठा उद्रेक आहे पण त्याबद्दल चर्चा करण्यात येते पण काँग्रेस पक्षातील आमदार दिल्लीला भेटायला गेले तर त्याची चर्चा केली जाते असाही टोला भाजपला यांनी लगावला आहे. आमच्या आमदारांची कोणत्याही मंत्रावर नाराजी नाही.
तर, ईडी कारवाई आतंकवादी, पैशाचे व्यवहार आणि ड्रग्स सोबतच खासदार यांनी केलेली कबूतरबाजी भाजपच्या खासदारांनी भारतातील मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करणे या सगळ्या वर अंकूश लवण्यासाठी ईडी ची निर्मिती केली होती. केंद्रीय सत्तेचा गैरवापर भाजप करते आहे त्यावरती अंकुश लावण्यासाठी सुमोटो लावण्यात यावा अशी विनंती आणि केली आहे. असेही ते म्हणाले.
[read_also content=”‘…मला वेडा कुत्रा चावलाय का?’ आलियाशी लग्नावर प्रश्न विचारताच रणबीरने दिलं असं उत्तर https://www.navarashtra.com/movies/ranbir-gave-shocking-answer-on-a-question-wedding-with-alia-nrak-262766.html”]