ती पुन्हा आली...! 13 महिन्यांच्या लढ्यानंतर माधुरी हत्तीणीचे नांदणीत मध्यरात्री जल्लोषात स्वागत
Kolhapur Madhuri Elephant Return: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील प्रसिद्ध नांदणी मठातील महादेवी आणि माधुरी नावाने ओळखली जाणारी हत्तीणीचे अखेर कोल्हापुरात पुनरागमन झाले. १३ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर तिला कोल्हापुरात आणण्यात यश आले. गुजरात येथील ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात असलेली माधुरी हत्ती न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानंतर पुन्हा कोल्हापुरात परतली आहे. माधुरी कोल्हापुरात दाखल होत असताना संपूर्ण नांदणी गाव तिच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. नांदणीसह सर्व ग्रामस्थानी तिचे जल्लोषात स्वागत केले.
कोल्हापूरची ‘महादेवी’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी हत्तीण हिच्या शहरात परतण्याचा वनताराने गुरुवारी एक निवेदन जारी केलं. या निवेदनानुसार “माधुरीला कोल्हापूरला परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. ९ सप्टेंबर रोजी उच्चाधिकार समितीने (एचपीसी) दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला.
Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
एचपीसीने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून, अहवालांचे पुनरावलोकन करून आणि महाराष्ट्रातील नंदनी येथील सुविधेची पाहणी करून माधुरीच्या परतीला मंजुरी दिली. या आदेशात अनेक अटीही घालण्यात आल्या आहे, ज्यात माधुरीला मिरवणुकीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही, याचा समावेश आहे.
वंताराने सांगितले की, हत्तीणीला २४ तास काळजी आणि दर दोन आठवड्यांनी वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असेल. एचपीसीच्या निर्देशांनुसार, माधुरीला ३० जुलै, २०२५ रोजी जामनगरमधील वंतारा येथे आणण्यात आले. या निर्देशांना मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. त्यांनी माधुरीचा ताबा मागितला नाही, तर निर्देशानुसार तिला ठेवून तिची काळजी घेतली.
Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
गेल्या वर्षी ‘पेटा इंडिया’ या प्राणिमित्र संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत माधुरीला आर्थरायटिस ( arthritis) आणि पायांचे गंभीर आजार असून मठात तिची योग्य काळजी घेतली जात नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०२५ मध्ये पेटाच्या याचिकेच्या आधारे माधुरीला अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ (Vantara) वन्यजीव पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार २८ जुलै २०२५ रोजी तिला वनतारा नेण्यात आले.
माधुरी हत्तीणीला गुजरातमध्ये पाठवल्यामुळे कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी संताप व्यक्त केला. माजी खासदार राजू शेट्टी, नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी माधुरीसाठी४५ किलोमीटरची पदयात्रा, मोर्चे, बंद आणि उपोषणेही केली. खास बाब म्हणजे, सोशल मीडियावरही ‘जियो बॉयकॉट’ सारख्या मोहिमा राबवून वनतारा प्रशासनावर दबाव आणला गेला.
कोल्हापुरकरांच्या भावना लक्षात घेता महाराष्ट्र सरकारनेही या लढ्यात उडी घेतली. नांदणी मठाच्या वतीने वकील मनोज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या हाय पॉवर कमिटी (HPC) समोर फेरविचार अर्ज सादर केला. त्यानंतर ‘वनतारा’ प्रशासनानेही न्यायालयात माधुरीच्या कोल्हापूर वापसीला सकारात्मक भूमिका दर्शवली. न्यायालयाच्या निर्देशानुसार एका उच्चस्तरीय संयुक्त समितीने नांदणी मठात जाऊन पाहणी केली. माधुरीसाठी मठात काही आद्ययावर सुविधा आणि वैदकीय केंद्राची उभारण्यात आले.
९ सप्टेंबर २०२६ च्या ऑनलाईन सुनावणीनंतर, १० सप्टेंबर २०२६ रोजी हाय पॉवर कमिटीने (HPC) काही अटीशर्थींसह माधुरीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यास अधिकृत मंजुरी दिली. – माधुरीचा वापर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक मिरवणुकीसाठी, उत्सवांसाठी किंवा श्रमाच्या कामांसाठी करता येणार नाही. तिच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी मठात २४ तास विशेष व्यवस्था ठेवावी लागेल. दर १५ दिवसांनी तिची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली जाईल, ज्यासाठी वनताराचे तज्ज्ञ डॉक्टर स्वतः नांदणी मठात येत राहतील.






