Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाला प्रशासकीय ‘ब्रेक’; केंद्र सरकारचा थेट प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा

Nashik Phata Khed elevated corridor - प्रकल्पातील या विलंबाची गंभीर दखल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी घेतली आहे. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 16, 2026 | 05:08 PM
नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाला प्रशासकीय ‘ब्रेक’; केंद्र सरकारचा थेट प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा
Follow Us
Follow Us:
  • नाशिक फाटा ते खेड दरम्यानचा ८ पदरी उन्नत (Elevated) मार्ग प्रकल्प
  • ७,८०७ कोटी ७६ लाख रुपयांच्या या प्रकल्पाला हिरवा कंदील पण
  • निधीअभावी भूसंपादन प्रक्रिया ठप्प झाली
विजया गिरमे, Nashik Phata Khed elevated corridor project: पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीवर फुंकर घालण्यासाठी प्रस्तावित असलेला नाशिक फाटा ते खेड दरम्यानचा ८ पदरी उन्नत (Elevated) मार्ग प्रकल्प प्रशासकीय अनास्थेमुळे अधांतरी लटकला आहे. प्रकल्प मंजुरीला १८ महिने उलटूनही जमिनीचा ताबा न मिळाल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला थेट ‘प्रकल्प गुंडाळण्याचा’ इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उद्या (बुधवारी) तातडीची आढावा बैठक बोलावली असून, या बैठकीत प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.

काय आहे नेमकी कोंडी?

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी ७,८०७ कोटी ७६ लाख रुपयांच्या या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता. नियमांनुसार, प्रकल्पाच्या रॅम्पसाठी लागणारी १४.१ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती. केंद्राने प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आणली असली, तरी राज्य सरकारने भूसंपादनासाठी घोषित केलेला ६२० कोटी रुपयांचा निधी अद्याप ‘पीएमआरडीए’ आणि ‘पिंपरी-चिंचवड महापालिके’च्या खात्यावर वर्ग केलेला नाही. निधीअभावी भूसंपादन प्रक्रिया ठप्प झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गोंधळ; सत्ताधारी नगरसेवकांचाच तीव्र विरोध डावलून प्रस्ताव मंजूर

केंद्राची तीव्र नाराजी

प्रकल्पातील या विलंबाची गंभीर दखल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी घेतली आहे. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. “भूसंपादन वेळेत न झाल्यास निविदा प्रक्रिया धोक्यात येईल आणि केंद्राला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पुनर्विचार करावा लागेल,” असा स्पष्ट इशारा केंद्राने दिल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Pune 23 Villages Development Plan: २३ गावांचा विकास आराखडा आता पुणे महापालिका तयार करणार; ५ वर्षांची प्रतीक्षा संपणार?

बुधवारची बैठक ठरणार निर्णायक

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१७ जून) ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाच्या कोंडीवर विशेष चर्चा होणार आहे. यासोबतच

खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार

रिंग रोड: भूसंपादनातील अडथळे दूर करणे.
ट्विन टनेल: पुण्यातील प्रस्तावित दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या गतीचा आढावा.
टीपी स्कीम्स: ‘पीएमआरडीए’च्या विविध नगररचना योजनांची सद्यस्थिती.
शासकीय जमीन: महापालिकेकडून जमिनी हस्तांतरणाबाबतचा प्रगती अहवाल.

एकीकडे पुणे-नाशिक दरम्यानच्या वाढत्या वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त असताना, महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ निधीअभावी कागदावरच राहिल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. आता राज्यमंत्री मिसाळ यांच्या बैठकीतून या प्रकल्पाला नवी गती मिळते की, तो केंद्राच्या सूचनेनुसार गुंडाळला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Nashik phata khed elevated highway project stalled central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Maharashtra Road Transport
  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा
1

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा

Sunetra Pawar : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन
2

Sunetra Pawar : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
3

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Pune News : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा
4

Pune News : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.