Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar Health Update: प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आवश्यक तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर ते पुन्हा कामकाजात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 03, 2026 | 06:59 PM
प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Follow Us
Follow Us:
  • प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
  • दोन दिवसांपासून ताप आणि अस्वस्थता जाणवत असल्याची माहिती
  • तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या होणार
 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे, बैठका आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या रोहित पवार यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी स्वतःहून रुग्णालयात जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. तब्येत ठीक नसतानाही त्यांनी पक्षाच्या विविध बैठका आणि नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांनी अधिक तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय गाठले.

रुग्णालयात त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला घेतला जाणार आहे. गरज भासल्यास काही अतिरिक्त चाचण्याही करण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब समोर आलेली नसून, नियमित तपासणी आणि उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण

रोहित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर सातत्याने दौरे करत आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारी आणि शिक्षणासारख्या विषयांवर त्यांनी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. अलीकडील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताणही वाढल्याचे मानले जात आहे.

गेले २-३ दिवस तब्येत साथ देत नसल्याने आणि याबाबत आज माध्यमांमधील बातम्या पाहून अनेक हितचिंतक फोन करतायत. आपल्या काळजीबद्दल धन्यवाद, पण काळजीचे काहीही कारण नाही. व्हायरल फ्लू किंवा इतर काही कारण आहे का, याबाबत तपासणी सुरू आहे. खरं तर डॉक्टरांनी आजार अंगावर न काढता सक्तीच्या… — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2026


विशेष म्हणजे, शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी हटविण्याच्या मागणीसाठी त्यांनी नुकतेच उपोषण केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने कर्जमाफीच्या काही अटी शिथिल केल्या आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पेपरफुटी प्रकरण, रोजगार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला सातत्याने धारेवर धरले आहे.

‘अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावी,’ विसरलेल्या भाषणावरून सुजात आंबेडकरांचा अमित ठाकरेंवर निशाणा !

सध्या उपलब्ध माहितीनुसार, रोहित पवार यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्या आरोग्याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांगितले जात आहे. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या नियमित राजकीय आणि सार्वजनिक कामकाजात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा आहे.

Web Title: Rohit pawar admitted breach candy hospital health update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.