Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

नाशिकमध्ये वाढत्या उष्णतेमुळे दररोज सुमारे ८० कोंबड्यांचा मृत्यू होत असून, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 31, 2026 | 02:11 PM
उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

Follow Us
Follow Us:
  • उष्माघाताचा कहर
  • दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
  • कोंबड्यांना उष्माघाताचा तीव्र फटका
वणी: राज्यात वाढत्या उष्णतेने सर्वसामान्य जनजीवनासह आता पशु-पक्ष्यांनाही हैराण केले आहे. सुरगाणा तालुक्यात सध्या तापमानाचा पारा ३७अंशांच्या आसपास पोहोचला असून, या भीषण उन्हाचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. बंदिस्त शेडमध्ये वाढवल्या जाणाऱ्या कोंबड्यांना उष्माघाताचा तीव्र फटका बसत असून, दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. जणू सूर्य आग ओकत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही पोल्ट्री फार्ममध्ये उष्माघातामुळे दररोज ५० ते ८० कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

Nashik School : मनपा शाळेत ‘वॉटर बेल’, उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण

उष्माघाताचा धोका वाढला

तापमान ३७ अंशांच्या वर गेल्याने कोंबड्यांची सहनशक्ती संपत आहे. शेडमधील कोंबड्यांना हवा खेळती न मिळाल्यास उष्माघाताचा धोका अधिक वाढतो. उन्हाळा नुकताच सुरू झाला असून, तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती आगामी काळात अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उष्णतेमुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचे खाणे-पिणे मंदावले आहे. वाढत्या मृत्यूनंतर शेतकरी हवालदिल झाले असून, आपले लाखो रुपयांचे नुकसान कसे भरून काढायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आगामी दिवसांत तापमानाचा उच्चांक गाठल्यास पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णता खूपच वाढली आहे. शेडमध्ये तापमान असल्यामुळे कोंबड्यांना उष्माघात होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पोल्ट्री व्यवसाय टिकवणे सध्या कठीण झाले आहे, अशी माहिती पोल्टी व्यावसायिक बाळू भरसट यांनी दिली.

पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांना नियंत्रित तापमानात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने शेडमधील उष्णता झपाट्याने वाढत आहे. पुरेशी वायुवीजन व्यवस्था, कूलिंग सिस्टम किंवा पाण्याची उपलब्धता नसल्यास कोंबड्यांना उष्माघाताचा धोका वाढतो. अनेक शेतकरी परिस्थितीशी झुंज देत असले तरी, वाढते वीजदर, कूलिंगसाठी लागणारा खर्च आणि व्यवस्थापनातील अडचणी यामुळे त्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी कोंबड्यांचे उत्पादनही घटले असून, अंडी उत्पादनावरही परिणाम दिसून येत आहे.

तज्ञांच्या मते, तापमान नियंत्रणासाठी शेडमध्ये फॉगर्स, पंखे, थंड पाण्याची व्यवस्था आणि योग्य आहार यांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, शासनाकडून मदत आणि मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत, उष्णतेच्या लाटेमुळे केवळ मानवी जीवनच नव्हे तर पशुपालन क्षेत्रही मोठ्या संकटाचा सामना करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Nagpur News : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन

Web Title: Heatwave impact nashik 80 chickens dying daily poultry business hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
4

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.