Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये

नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीसमोरील पेच अधिकच गडद झाला आहे. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात अपयश आल्याने राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी विविध स्तरांवर गुप्त बैठका आणि संपर्क मोहीम सुरू केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 03:06 PM
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये

Follow Us
Follow Us:
  • बंडखोरी शमवण्यात अपयशच
  • मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल
  • मनधरणीसाठी बैठका सुरूच !
नाशिक : नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीसमोरील पेच अधिकच गहिरा झाला आहे. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचे गेल्या दोन दिवसांतील प्रयत्न अपयशी ठरल्याने, संकटमोचक मानले जाणारे राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन रविवारी (७ जून) पुन्हा तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील आव्हान सुकर करण्यासाठी महाजन यांनी नाशिकमध्येच मुक्काम ठोकत विविध स्तरांवर गुप्त बैठका आणि संपकांचे सत्र सुरू केले आहे. मात्र, उशिरापर्यंत सुरू असलेल्या या चर्चामधून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा तोडगा समोर आलेला नाही. ४ जून रोजी असणारी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरही नाशिकमध्ये अपक्षांची बंडखोरी कायम राहिल्याने आता ही निवडणूक अधिकृतपणे ‘तिरंगी’ झाली आहे. यामुळे मतदार असलेल्या लोकप्रतिनिधींच्या (नगरसेवकांच्या) मतांना सोन्याची किंमत आली असून, राजकीय वर्तुळातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार

निवडणूक तिरंगी; दराडेंसमोर गिते आणि हिरेंचे तगडे आव्हान !

नाशिकच्या रिंगणात आता तीन प्रमुख उमेदवार आमनेसामने ठाकल्याने लढत कमालीची चुरशीची बनली आहे महायुती (अधिकृत): शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार नरेंद्र दराडे, बंडखोर अपक्ष भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते, बंडखोर/अपक्ष माजी मंत्री बळीराम हिरे यांचे सुपुत्र प्रसाद हिरे या दोघांनीही माघार न घेतल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. आता या दोघांपैकी कोणाचा तरी अधिकृत पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीचे नेते फिल्डिंग लावत आहेत.

भाव वधारला ! ‘घोडेबाजारा’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले

निवडणूक तिरंगी झाल्यामुळे प्रत्येक मत विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदार असलेल्या नगरसेवकांच्या मतांचे महत्व प्रचंड वाढले असून स्थानिक पातळीवर मोठ्या ‘आर्थिक व्यवहारांच्या चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोडेबाजाराचा इतिहास जुनाच असला, तरी यंदा मतांची किमत कमालीची वाढल्याच्या बर्वांनी राजकीय वातावरण अधिकच तापविले आहे, मात्र या चर्चाना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

सामंत-महाजन जोडी नाशिकमध्ये तळ ठोकून

नाशिकचा हा तिढा सोडवण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन या दोन्ही बड्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये मुक्काम करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बंडखोरांनी माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने हा प्रयत्न निष्फळ ठरला. परिणामी, रविवारी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये येत स्वतः सूत्रे हाती घेतली असून राजकीय तडजोडीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

Nashik Rain : वादळी पावसाचा शहर-जिल्ह्याला तडाखा! पाणीच पाणी, वीजपुरवठा खंडित; खड्डेमय रस्त्यांनी नागरिक हैराण

नगरसेवकच ठरणार ‘किंगमेकर’

या निवडणुकीत नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकांसह जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निर्वाचित नगरसेवक हेच मतदार आहेत.

राजकीय निरीक्षकांच्या मते, जर लढत तिरंगीच राहिली, तर उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क आणि ऐनवेळी मिळणारे पाठिंबे नगरसेवकांची राजकीय गणिते उलथीपालथी करू शकतात.

यामुळेच सर्वच उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मतदार नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मनधरणी, बैठका आणि गुप्त संपर्क मोहिमा तीव्र केल्या आहेत.

आता मंत्री गिरीश महाजन यांच्या या ‘नाशिक मुक्कामातून’ महायुतीला बंडखोरांचा पाठिंबा मिळवण्यात यश येते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nashik mlc election mahayuti crisis girish mahajan secret meetings rebels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • girish mahajan
  • Maharashtra Politics
  • Nashik

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
3

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
4

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.