
जून-जुलैला दिवसाला २००, ऑगस्टमध्ये थेट ६४२ खड्डे! महापालिकेच्या खड्डे बुजविण्यावर शंकेचे ढग
शहरातील खड्डे दरवर्षाचा विषय असून, यंदाही त्यातून ऑगष्ट उजाडला तरी दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामागे अनेक कारणे दिली जात आहेत. पावसाची संततधार, ठेकेदारांची काम करण्याची खड्डे बुजविण्यासाठी लागणारे साहित्याची व सामानाची वाणवा व मनुष्यबळाचे नेहमीचे विषय कायम आहेत. बांधकाम विभागाकडे पुरेसे अभियंते नाहीत, जे आहेत त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी बिगारी नसल्याच्या तक्रारी पुढे करून वेळ मारून नेली जात आहे. अशातच खड्यांमुळे सर्वसामान्यांचा व्यक्त होणारा रोष व राजकीय पक्षांकडून केली जात असलेली आंदोलने पाहता महापालिकेने जून महिन्यापासून आत्तापर्यंत सुमारे ११,६०९, खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या चार दिवसात २,५६८ खड्डे बुजविल्याचे म्हटले आहे.
Nashik Kumbh Mela: पंचवटीतील पेठ रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
गेल्या चार दिवसापासून शहरातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी महापालिकेसमोर रस्त्यांवरील खङ्ख्यांच्या प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. त्यातच आजपावेती खड्डयात पडून पाच बळी गेले असून, दररोज अपघातांची मालिका सुरू आहे. अशात ऑगष्टच्या चार दिवसात २५६८ खड्डे बुजविल्याचे मनपाचे म्हणणे आहे. याचा अर्थ दररोज ६४२ खड्डचाचा निपटारा करण्यात आला आहे. जनआंदोलनाव्या रेट्यामुळे मनपाचा वेग वाढला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हाच वेग कामाचा होता तर जून महिन्यात दररोज फक्त २०० दोनशेच खड्डे का बुजविण्यात आले असेही विचारले जात आहे.
मनपासमोरील अडचणी पाहता त्यावर मात करण्याची त्यांची कसोटी व कसरत वाखाणण्याजोगीच म्हणण्यासारखी वाटू लागली आहे. मात्र वास्तवतेचा विचार करता, जून व जुलै महिन्यातील ६१ दिवसांचा हिशेब पाहता त्यातील १६ दिवस शनिवार, रविवारच्या सुट्टया लक्षात घेता जेमतेम खड्डे बुजविण्यासाठी ४५ दिवस शिल्लक राहतात. त्यातील पावसातही मनपाने खड्डे बुजविले तरी त्याचे प्रमाण दिवसाला २५२ खड्डे बुजविल्याचे त्यांचे म्हणणे कितपत खरे मानावे असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
शहरात नेमके खड्डे आहेत, याची अधिकृत आकडेवारी महापालिकेने स्पष्ट केलेली नाही, गेल्या दोन महिन्यात जर ११,६०९ खड्डे बुजविले असतील तर शहरात नेमके किती खड्डे आहेत याचा अंदाज बांधता येतो. अजूनही प्रत्येक रस्त्यांवर खड्डुच्चांची साखळी आहे. दररोज होणारे आंदोलने व निवेदनांचा भाडीमार तसेच अपघातांची संख्या लक्षात घेता अजुनही खड्डे असल्याचे स्पष्ट होत असतांना अजून किती खड्डे आहेत आणि किती दिवस खड्डे बुजविण्णार हे मात्र सांगितलेले नाही.