Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

Nashik Potholes: नाशिक शहरातील खड्डे आणि महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. खासदार संजय राऊत आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 01:14 PM
नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार
  • खड्ड्यांविरोधात संजय राऊतांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा
  • संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
Sanjau Raut On Nashik Potholes: नाशिक शहरातील ( Nashik Potholes) खड्डे, खराब रस्ते आणि महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (17 ऑगस्ट 2026) नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा मोर्चा नाशिकमधील शिवसेना कार्यालयापासून नाशिक महापालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आला. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा वाढता धोका याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Nashik News: श्रावणी सोमवारच्या गर्दीचा वाहतुकीला फटका; खड्डे अन् अपघातांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्ग ठप्प

मोर्चात यमराज आणि रेड्याचे प्रतीकात्मक रूप

ठाकरे गटाने या मोर्चाला आक्रमक स्वरूप देताना प्रतीकात्मक यमराज आणि रेडा देखील मोर्चात आणला. खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. ‘यमाने आता मनपात जाऊन माजालेल्यांवर रेडा सोडायचा,’ असा टोला त्यांनी प्रशासनाला लगावला.

‘महापौर, आयुक्तांकडे संवेदनशीलता असेल तर निवेदन स्वीकारा’

मोर्चादरम्यान बोलताना संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले. ‘महापौर, आयुक्तांकडे संवेदनशीलता असेल तर निवेदन स्वीकारा,’ असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास तसेच अपघातांचा धोका याबाबत ठाकरे गटाकडून महापालिकेकडे जाब विचारण्यात आला.

महापालिका प्रशासनाविरोधात निवेदन

मोर्चानंतर ठाकरे गटाकडून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनीही महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाने महापालिका प्रशासनाला थेट लक्ष्य केले आहे. त्यामुळे या मोर्चानंतर महापालिका प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

Web Title: Nashik potholes thackeray shiv sena protest potholes sanjay raut municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Nashik
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
1

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
2

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा
3

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
4

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.