Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’, पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित

नाशिक शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. दरवर्षी महापालिकेकडून नळधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 10, 2026 | 12:45 PM
बाराशे नळधारकांना मनपा बजावणार 'वॉरंट', पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित

बाराशे नळधारकांना मनपा बजावणार 'वॉरंट', पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित

Follow Us
Follow Us:
  • बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’
  • पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित
  • ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली
नाशिक : घरपट्टी वसुलीबरोबरच गेल्या काही वर्षापासून नळपट्टी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नळ धारकांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असून, त्यासाठी प्रत्येक विभागातील बड्या थकबाकीदार असलेल्या १२०० नळ धारकांना वसुलीसाठी ‘वॉरंट’ बजावण्यात येणार आहे. या शिवाय दिडशे नळ कनेक्शन कट करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.

शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. दरवर्षी महापालिकेकडून नळधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते. परंतु मोजक्याच लोकांकडून त्याला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे दरवर्षी थकबाकीची रक्कम वाढत जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नळ धारकांना मिटर बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार

६०० मिळकतधारकांना वसुलीच्या नोटिसा

नळपट्टीबरोबरच घरपट्टी थकीत असलेल्या शहरातील सहाशे मिळकतधारकांनाही पहिल्या टप्यात नोटीसा बजावण्यात येत आहेत. यदा कर विभागाला दिलेल्या उद्दिष्टापैकी २१२ कोटी रूपये आतापर्यंत वसुल झाले आहेत. येत्या दिड महिन्यात सुमारे ४८ कोटी रूपये वसुल होणे अपेक्षित आहे. त्यासाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आयुक्तांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आयुक्तांनी दिल्या विभागीय अधिकाऱ्यांना सूचना

नळपट्टीचे देयके वेळेत मिळत नसल्याची सबब पुढे करून थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने चार दिवसांपुर्वीच महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी विभागीय अधिकारी, कर उपायुक्तांची बैठक घेवून त्यात घरपट्टी वसुलीचा आढावा घेवून थकबाकीदारांवर कारवाई करून सक्तीच्या वसुलीसाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने प्रत्येक विभागातील दोनशे
याप्रमाणे बाराशे थकबाकीदार नळधारकांच्या याद्या करून त्यांना वसुलीसाठी ‘वॉरंट’ बजावण्याच्या सुचना केल्या आहेत. या शिवाय प्रत्येक विभागातील २५ या प्रमाणे दिडशे नळ कनेक्शन कट करून वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दिड महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तत्पुर्वी थकीत ७५ कोटीची वसुली करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.

Nashik Deputy Mayor : “जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा…”, नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे यांची भूमिका स्पष्ट

Web Title: The municipal corporation will issue warrants to 1200 water tap holders 150 water connections suspended in the first phase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Water Issue

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.