Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Farmers : शेतकरी चिंतेत ! पूर्वमान्सूनची साथ नाही; येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया

खरीप हंगामाच्या तोंडावर येवला तालुक्यातील शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षी याच काळात झालेल्या जोरदार पूर्वमान्सून आणि मान्सून पावसामुळे पेरण्यांना वेग आला होता. मात्र यंदा जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली असून शेतकरी चिंतेत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 12:38 PM
Buldhana farmers Kharif crop damage

Buldhana farmers Kharif crop damage

Follow Us
Follow Us:
  • पेरणीसाठी शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा
  • गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने घेतली विश्रांती
  • येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया
येवला : खरीप हंगामाच्या तोंडावर येवला तालुक्यातील शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. गतवर्षी याच कालावधीत जोरदार पूर्वमान्सून व मान्सून पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला होता आणि पेरण्यांना वेग आला होता. मात्र यंदा जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत.

गेल्या वर्षी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस पिकांच्या पेरण्या सुरू केल्या होत्या. अनेक शेतांमध्ये पेरणीची कामे पूर्णही झाली होती. यंदा मात्र पावसाची परिस्थिती निराशाजनक असल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तालुक्यात अधूनमधून ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असला तरी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झालेला नाही. काही भागांत किरकोळ सरी कोसळल्या असल्या तरी त्यामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झालेला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय पुढे ढकलला आहे.

Mira Bhayandar News: ‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

हवामान खात्याने पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पावसावर टिकून आहेत. दरम्यान, मान्सून उशिरा सक्रिय झाल्यास खरीप हंगामाचे नियोजन आणि पिकांची निवड यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खते, मशागतीची कामे पूर्ण

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते आणि मशागतीची कामे बहुतांश शेतक-यांनी पूर्ण केली आहेत, मात्र पाऊस नसल्याने ही सर्व तयारी सध्या प्रतीक्षेतच आहे. कृषी विभागाकडूनही घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पुरेसा व सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी जून २०२५ पर्यंत तालुक्यात सरासरी १५.५० मिमीच्या तुलनेत ८८७० मिमी पावसाची नोंद झाली होती. अनेक मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कितीतरी पटीने अधिक पाऊस झाला होता, यंदा मात्र बेमोसमी आणि मोसमी अशा दोन्ही प्रकारच्या पावसाने दडी मारल्याचे वित्र आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. सध्या जमीन तात झालेली आहे. आता पाऊस झाला जमीन पूर्णतः भिजल्यावर व वापसा झाल्यावरच पेरणी तरी शेतक-यांनी लगेच पेरणी करण्याची घाई करू नये. जमीन पूर्णत: भिजल्यावर व वापसा झाल्यावरच पेरमी करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी, येवला , शुभम बेरड यांनी दिली.

‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश

Web Title: Yeola kharif season farmers waiting for rain nashik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Farmers
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
4

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.