Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नांदेड लोकअदालतीत ६ हजार १९९ प्रकरणे निकाली; ३८ कोटींची झाली तडजोड

मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रहो, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 16, 2026 | 04:34 PM
National Lok Adalat Organized in Nanded; Settlements Worth ₹38 Crore Reached

National Lok Adalat Organized in Nanded; Settlements Worth ₹38 Crore Reached

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रहो, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, एन.आय. अॅक्टची प्रकरणे निकाली काढली आहेत. (Nanded News)

याचबरोबर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वाद पुर्व मालमत्ता कराची प्रकरणे, गुन्हा कबुलीची प्रकरणे, आर.टी.ओ. व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कौटुंबिक, कामगार, सहकार, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच प्रकरणे, सर्व बॅंक प्रकरणे, फायनान्स कंपनीची प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली व दाखलपुर्व प्रकरणे, बि.एस.एन.एल. कंपनी प्रकरणे, एम.एस.ई.डी.सी.एल. कंपनी इत्यादी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. यामधून नांदेड वाघाळा महापालिका, वाहतूक विभाग आणि इतर क्षेत्रांना देखील मोठा फायदा झाला आहे.

हे देखील वाचा : MIDC कंपन्यासाठी पारंपारिक स्मशानभूमी जमीनदोस्त! ग्रामस्थांनी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

या सर्व प्रकरणांच्या सुनावणी करिता नांदेड जिल्ह्यात एकुण ३३ पॅनल तयार करण्यात आले होते. दि. १४मार्च रोजी झालेल्या लोक न्यायालयात नांदेड जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित एकूण १२६६९ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी ११३५ प्रकरणे निकाली व जवळपास २९८१८४५०२ रुपयांचे तडजोड मुल्य होते. मालमत्ता थकबाकी व पाणीपट्टीची ४५२८ प्रकरणे निकाली निघाली व ४५६३८३८३ रूपयांचे तडजोड मुल्य होते.

असे एकूण ६१९९ प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मुल्य ३८०४६०७५९ रूपये एवढे आहे. विषेश म्हणजे १४ कोटींचे मुख्य दिवाणी प्रकरण आणि एम.ए.सी.टी.चे १०३ प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदातीमध्ये निकाली निघाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे आभार मानले.

हे देखील वाचा : राजकीय नेत्यांच्या प्रशिक्षणाला ‘ब्रेक’, नगरसेवकांची दांडी; रिकाम्या खुर्त्यांचीच चर्चा

८० टक्के दिली सूट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये थकबाकीदारांकडून तब्बल ५.५८ कोटी मालमत्ता कराची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेने लोक आदालतीमध्ये आपल्या यकित कराचा भरणा केल्यास शास्तीवरील रक्कमेत तब्बल ८०% टक्के सूट जाहीर केली होती, या योजनेचा लाभ घेत एकूण ३७९९ मालमत्ताधारकांनी आपल्या थकित कराचा भरणा करून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य केले आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत तब्बल ३७९९ मालमता धारकांनी मोठ्या प्रमाणात कर भरला असून लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांवर तडजोड करून दंड आणि व्याजामध्ये नियमानुसार सवलत देण्यात आली, ज्यामुळे करदात्यांचा कल वसुलीकडे वाढल्याचे चित्र आहे.

Web Title: National lok adalat organized in nanded settlements worth 38 crore reached nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Court News
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

२०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात
1

२०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.