Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

Nepal Flood : नेपाळमधील महापुरामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूरचे 106 भाविक पाटणाहून रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले असून कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविक मुंबईत परतणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 09:18 PM
नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

Follow Us
Follow Us:
  • नागपूरचे 106 भाविक पाटणाहून रेल्वेने नागपूरकडे रवाना
  • कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविक मुंबईत परतणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी सरकारकडून समन्वय
Nepal Flood : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविक आणि पर्यटकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपूरचे 106 भाविक सुरक्षितपणे मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले आहेत. याशिवाय कैलास मानसरोवर यात्रेवरून परतताना तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविकही मुंबईत परतणार आहेत.

नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे

नेपाळमध्ये दर्शनासाठी गेलेले नागपूरचे 106 भाविक काठमांडू येथे अडकले होते. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे त्यांचा परतीचा प्रवास रखडला होता. या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक सूचना दिल्या.

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम…

काठमांडू प्रशासनाच्या मदतीने भाविकांसाठी चार खासगी बसची व्यवस्था करण्यात आली. या बसमधून सर्व 106 भाविक शुक्रवारी काठमांडूहून सीतामढीकडे रवाना झाले. त्यानंतर बिहार सरकारच्या मदतीने ते रात्री पाटणा येथे पोहोचले.

यातील चार भाविक विमानाने दिल्लीला पोहोचले असून तेथून रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले आहेत. तर उर्वरित 102 भाविक शनिवारी सकाळी पाटणाहून रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले. त्यामुळे भाविकांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

37 भाविक मुंबईत परतणार

कैलास मानसरोवर यात्रेवरून परतताना नेपाळमधील महापुराच्या परिस्थितीमुळे तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील 37 भाविक अडकले होते. त्यांनाही सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे.

हे 37 भाविक आता काठमांडूहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी नगरसेवक विनोद शेलार उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याचा संपर्क तुटला

दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या मुंबईतील एका डॉक्टर दाम्पत्याचा संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे हे नेपाळमध्ये गेले होते.

डॉ. आनंद देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयातील रक्त संक्रमणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत, तर डॉ. गायत्री देशपांडे नानावटी रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख असल्याची माहिती आहे. ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या टूर कंपनीमार्फत हे दाम्पत्य नेपाळला गेले होते.

देशात सर्वाधिक जमीन सरकारी मालकीची; संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे देखील प्रमुख जमीनदार

बुधवारी सकाळी 8.28 वाजता कुटुंबीयांचा त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. व्हॉट्सॲप संदेशांनाही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या डॉक्टर दाम्पत्यासह महाराष्ट्रातील आणखी काही पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांच्या शोधासाठी आणि सुरक्षित परतीसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकार तसेच नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला जात आहे.

Web Title: Nepal flood maharashtra pilgrims rescue nagpur 106 mumbai 37 return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Nepal Flood

संबंधित बातम्या

Nepal Flood Damage : नेपाळमध्ये निसर्गाचा तांडव! सगळीकडे हाहाःकार… पूरग्रस्त देश सावरण्यासाठी 48000 कोटींची गरज
1

Nepal Flood Damage : नेपाळमध्ये निसर्गाचा तांडव! सगळीकडे हाहाःकार… पूरग्रस्त देश सावरण्यासाठी 48000 कोटींची गरज

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
2

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!
3

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!

Nepal Flash Flood: आंतरराष्ट्रीय मदतीबाबत बालेन शाह यांचा मोठा निर्णय; भारत आणि चीनकडे आपत्कालीन याचना
4

Nepal Flash Flood: आंतरराष्ट्रीय मदतीबाबत बालेन शाह यांचा मोठा निर्णय; भारत आणि चीनकडे आपत्कालीन याचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.