Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेरळ रेल्वे स्थानकात अज्ञात व्यक्तींनी बेकायदा जाहिरातीचे स्टिकर्स जागोजागी लावल्याने स्थानकाचे सौंदर्य बिघडल्याचा आरोप प्रवासी आणि स्थानिक संघटनांकडून करण्यात आला आहे. ‘घडी पॅकिंग’ व्यवसायाच्या जाहिरातीचे झेरॉक्स स्वरूपातील स्टिकर्स लिफ्ट, पादचारी पूल, स्कायवॉक आणि तिकीटघर स्थानकाचे विद्रूपीकरण झाल्याची टीका होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 10, 2026 | 04:39 PM
रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • मेकओव्हरनंतर नेरळ स्थानक विद्रूप!
  • जाहिरातीच्या स्टिकर्समुळे सौंदर्याला ग्रहण
  • प्रवाशांकडून कारवाईची मागणी
 

कर्जत : नेरळ रेल्वे स्थानकात काही अज्ञात लोकांनी जाहिरातीचे स्टिकर लावले. हे स्टिकर अख्या नेरळ स्थानकात जागोजागी लावण्यात आले आहेत.त्यामुळे नेरळ स्थानकाचे सौंदर्य नष्ट होण्यास मदत झाली असून नेरळ स्थानक परिसर विद्रूप करणाऱ्या जाहिराती मधील संबंधित कंपनीवर रेल्वेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी काही प्रवासी आणि नेरळ प्रवासी संघटनेने केली आहे.

कोणत्याही रेल्वे स्थानकात जाहिरात फलक लावण्याचे कंत्राट मध्य रेल्वे कडून दिले जातात.त्यात उपनगरीय लोकल मधील जाहिराती यांचा देखील समावेश असून उपनगरीय लोकल मध्ये परवानगी विना आपल्या संस्थेची जाहिराती करणारे स्टिकर लावणाऱ्यावर कारवाई केली जात असल्याने असे बेकायदा स्टिकर लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रकारे कोणत्याही स्थानकात असे बेकायदा फलक लावण्याचे प्रमाण नगण्य आहे.मात्र नेरळ सारख्या मध्य रेल्वे वरील नव्याने मेकओव्हर केलेल्या जंक्शन रेल्वे स्थानकात दोन दिवसात असंख्य जाहिरात स्टिकर लावण्यात आले.

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

घडी पॅकिंग या व्यवसायाची जाहिरात करणारे स्टिकर नेरळ स्थानकात जागोजागी लावले आहेत.त्याचा परिणाम चांगले सुसज्ज बनलेल्या नेरळ स्थानकात जागा मोकळी आहे तेथे हे स्टिकर लावले गेले आहेत.त्याचा परिणाम नेरळ स्थानक विद्रूप झाले असून लिफ्ट मध्ये, पादचारी पुलावर तसेच स्काय वॉक वर याशिवाय तिकीट घराजवळ देखील असे स्टिकर लावले गेले आहेत.कोणत्याही रंगीबेरंगी पद्धतीने बनवलेले जाहिरात स्टिकर नाहीत तर साधी झेरॉक्स कॉपी स्वरूपातील हे स्टिकर आहेत.त्या स्टिकर मुळे नेरळ स्थानकाचे सौंदर्य बिघडले आहे.मागील पाच वर्षात नेरळ स्थानकात तीन पादचारी पूल,तीन लिफ्ट तसेच दोन्ही बाजूंना जोडणारा स्काय वॉक याशिवाय निवारा शेड आणि सरकते जिने यासाठी मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.असे असताना घडी पॅकिंग सारख्या झेरॉक्स प्रति मधील जाहिराती यामुळे नेरळ स्थानक विद्रूप होण्यास मदत झाली आहे.

हे स्टिकर लावले जात असताना रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेला दिसले नाही याचे सर्वाधिक नवल प्रवासी व्यक्त करीत आहेत. स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी तसेच होमगार्ड देखील तैनात असतात.अशावेळी कोणालाही त्या स्टिकर लावणाऱ्या यांचा थांगपत्ता लागला नाही हे शक्य नाही अशी टीका प्रवाशांनी केली आहे. स्थानकातील अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच अशा जाहिराती कोणत्याही परवानगी विना लावल्या जाऊ शकतात.त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यात बघून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.त्यात नेरळ स्थानकातील सुरक्षा यंत्रणा यांना कोणी एक नाहीतर हजारो ठिकाणी जाहिराती लावल्या जात असताना दिसले नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे.दुसरीकडे घडी पॅकिंग अशी जाहिरात करणाऱ्या जाहिरात स्टिकर वर असलेल्या फोन नंबर वर अनेक प्रवाशांनी संपर्क केला असता तुम्ही कुठेही तक्रार करा अशी उलट धमकी त्या नंबर वर बोलणारी महिला नेरळ स्थानकातील प्रवाशांना देत होती.त्यामुळे त्या व्यक्तीवर आधी कारवाई करावी अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने नेरळ स्थानक प्रबंधक यांच्याकडे केली आहे.

नेरळ स्थानकात या जाहिराती कोणी लावल्या याबाबत माहिती घेत असून संबंधितांची माहिती मिळाल्यावर कारवाई करण्यावर संबंधित विभागाला सूचित केले जाईल, अशी माहिती स्थानक प्रबंधक जी पाटील यांनी दिली.

Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा

Web Title: Neral railway station illegal advertisement stickers action demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • central railway
  • matheran news
  • neral
  • railway

संबंधित बातम्या

Dharashiv Railway Project: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाला 240 कोटींचे बळ; राज्याच्या हिश्श्याचा निधी मंजूर
1

Dharashiv Railway Project: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाला 240 कोटींचे बळ; राज्याच्या हिश्श्याचा निधी मंजूर

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.